
भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 79 स्वातंत्र्य दिन साजरा......
साप्ताहिक सागर आदित्य
भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 79 स्वातंत्र्य दिन साजरा......
भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड मध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय अमृताताई देशमुख यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय मंजुषा सु.देशमुख मॅडम, व पर्यवेक्षक आदरणीय सुनील डहाळके सर हे होते. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याचे जनक महात्मा गांधी व विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर आदरणीय अमृताताई देशमुख यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय तसेच देशाची एकात्मता अखंड आणि धर्मनिरपेक्षता जोपासण्यासाठी आपण कटिबद्ध राहु असा सूचक सल्ला आपल्या मनोगतातून दिला. नंतर प्राचार्या मंजुषा सु.देशमुख मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देत स्वातंत्र्य आणि संविधान ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अमूल्य देणगी आपणाला मिळाली 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याचा अर्थ आणि दिशा ही केवळ संविधानामुळे आपणाला मिळाली. मनोगतातून विचार व्यक्त केले. आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले. शेवटी आदरणीय पर्यवेक्षक सुनील डहाळके सर आपले मनोगत व्यक्त करताना महापुरुषांनी स्वतःच्या दृष्टिकोनातून सामाजिक,न्याय, समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांना राष्ट्राच्या पायाभूत तत्त्वात स्थान दिले. असे सूचक विधान केले. रजनी नकवाल मॅडम यांनी बहारदार सुमधुर देशभक्तीपर गीतातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच आचल साळवे या विद्यार्थिनीने स्वातंत्र्या विषयी आपले प्रखर व बारदार मनोगत व्यक्त केले. व समृद्धी खडसे, किरण कोरडे, संस्कृती पावडे, प्रशसा साळवे या विद्यार्थिनी देशभक्तीपर गीत गायन केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय हराळकर सर यांनी केले.
0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 79 स्वातंत्र्य दिन साजरा...... "
Post a Comment