
कोंडेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी
साप्ताहिक सागर आदित्य
कोंडेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी
कोंडेश्वर नगरी दत्त नगर लाखाळा येथील कोंडेश्वर संस्थान हे परिसरातील श्रद्धावान शिवभक्तांचे प्रमुख जागृत देवस्थान असून श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार हा अंत्यन्त महत्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी शिवमुठ म्हणून महादेवाच्या पिंडीला मुंग वाहण्याची प्रथा आहे. शंकाराला मूग अर्पण केल्यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे. कर्जमुक्ती होते, घरात समाधान नांदतं असंही सांगण्यात येतं तसेच श्रावण हा हिरव्यागार ऋतुचा महिना आहे. कडधान्य या काळात परिपक्व झालेली असतात. पौराणिक काळापासून श्रावण मासात धार्मिक कार्य, सण-उत्सवांची परंपरा आहे.
पूर्वीच्या कृषीप्रधान संस्कृतीत आलेलं पहिल पीक हे शंकराला वाहण्याची प्रथा आहे. त्यातून पीक समृद्धी आणि निसर्गाबाबत ऋण व्यक्त करण्याची भावना आहे. त्यामुळेच मुगाची शिवामूठ शंकराला वाहण्याची परंपरा पूर्वीपासून सुरु असल्याचं मानण्यात येतं. त्या अनुषंगाने सकाळी चार वाजता पासूनच महिला व पुरुष भाविक भक्तांनी या
ठिकाणी दर्शनासाठी गर्दी असते शिवलिंगासाठी समोर विराजमान असलेला नंदी भक्तांचे स्वागत करत असतो. श्रावण सोमवार, महाशिवरात्र, तसेच दररोज
शेकडो भक्त दर्शन घेतात अभिषेक होतात हे ठिकाण जागृत कोंडेश्वर स्थान मानले जाते.
0 Response to "कोंडेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी"
Post a Comment