
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे स्वातंत्र्य
दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता झाली.ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष सदाशिवराव भगत साहेब यांच्या हस्ते झाला. त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले . तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या शाळेच्या सेवानिवृत् शिक्षिका कु. बेलखडे मॅडम यांनी प्रतिमेचे पूजन करून आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत ,राज्य गीत, संविधान उद्देशिका, व देशभक्तीपर गीत म्हटले, देशभक्तीपर नाऱ्याचा जयघोष केला. अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व भाषणे दिली. शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन यांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरणाचे कौतुक केले. त्यांना भविष्यात देश सेवा करण्यासाठी प्रोत्साहित केले हर घर तिरंगा या कार्यक्रमाचा तिसऱ्या टप्प्यांमध्ये संगीतमय कवायत करण्यात आली. तसेच तहसील कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून प्रभात फेरी च्या माध्यमातून "अमली पदार्थ विरोधी "जनजागृती पोलीस स्टेशन मानोरा व वसंतराव नाईक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅली काढण्यात आली. त्या रॅलीमध्ये"नवे युग नवा निर्धार व्यसनाला करा हद्दपार"! नको अमली पदार्थाची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा! अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. यावेळी मानोरा पोलीस स्टेशन च्या ठाणेदार कुमारी पोहेकर मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे साहेब व सहकारी कर्मचारी यांच्यासह शाळेची शिक्षक सतीश भगत सर , विकल सिंग राठोड, चंद्रशेखर वानखडे, रुपेश जयस्वाल, निलेश उजवे, अभिजीत तायडे, मोहसीन शेख, अक्षय भगत, शिव मार्गे, शिक्षिका कु. एस. पी. भालेराव, कु. व्ही .व्ही. चातुरकर, कु जे.पी. इंगोले, कुमारी व्ही.जे सरनाईक, कु. तेजस्विनी इंगळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा"
Post a Comment