
नारायणा किड्स मध्ये मोठा उत्साहात घेण्यात आली ट्राय कलर डे ऍक्टिव्हिटी. ट्राय कलर डे दिनानिमित्त
साप्ताहिक सागर आदित्य
नारायणा किड्स मध्ये मोठा उत्साहात घेण्यात आली ट्राय कलर डे ऍक्टिव्हिटी. ट्राय कलर डे दिनानिमित्त वर्ग नर्सरी ते युकेजी च्याविद्यार्थ्यांना केशरी हिरवा पांढरा या रंगां च्या पोशाखामध्ये बोलविण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना केशरी पांढरा व हिरवा या रंगांबद्दल माहिती देण्यात आली यामध्ये त्यांना सांगण्यात आले की केशरी हा रंग क्रांतिवीरांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. तसेच पांढरा हा देशाच्या स्वच्छतेचे प्रतीक आणि हिरवा रंग हा आपल्या हरितक्रांतीचे प्रतीक आहे तसेच तिरंग्यामध्ये असलेले अशोक चक्र हे विविधतेत एकात्मता दर्शविते. अशोक चक्रांमध्ये 24 आऱ्याअसतात.
हे विद्यार्थ्यांना माहिती द्वारे सांगण्यात आले. ही ऍक्टिव्हिटी घेण्यामागचा उद्देश
क्रांतिवीरांनी केलेल्या बलिदानाविषयी माहिती देणे तसेच राष्ट्रध्वजांमध्ये असलेले कलर कशाचे प्रतीक आहे हे पटवून देणे हा होता.
शाळेचे अध्यक्ष अनिल धुमकेकर सर व आरती धुमकेकर मॅडम आणि अतुल धुमकेकर सर उपस्थित होते. व नारायणा किड्स च्या मुख्याध्यापिका जयश्री पाचपोर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच नारायणा सेकंडरी हायर सेकंडरीच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी सराटे मॅडम, एम. एम . एस .ई प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका धुमकेकर ह्या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवीली.वर्ग नर्सरी ते युकेजी वर्गाच्या शिक्षकांचे तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
0 Response to "नारायणा किड्स मध्ये मोठा उत्साहात घेण्यात आली ट्राय कलर डे ऍक्टिव्हिटी. ट्राय कलर डे दिनानिमित्त "
Post a Comment