
भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण
रिसोड : माजी खासदार तथा दि आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत प्राथमिक मराठी शाळेत जय पारितोषिक योजनेअंतर्गत बक्षीस वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारत प्राथमिक मराठी शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, गटशिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे, माजी मुख्याध्यापिका शीलाताई उकळकर, छायाताई खके, प्राचार्य संजय भांडेकर,प्राचार्या मंजुषाताई देशमुख,मुख्याध्यापक मधुकर शिंदे, रोजमेरी , मुख्याध्यपिका किरणताई दुबे,आदी मन्यावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांनी शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने जय पारितोषिक योजनेची सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगितले.
यांनतर जय पारितोषिक योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर म्हणाल्या की, "विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी दी आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतरावजी देशमुख सदैव प्रयत्नशील असतात. त्यामुळे दी आर्य शिक्षण संस्था ही एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे.तसेच अपयशाने खचून न जाता प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ध्येयपूर्तीसाठी नेहमीच महत्वाकांक्षी राहून जिद्द, चिकाटी, अभ्यासूवृत्ती जोपसावी."असे प्रतिपादन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख या प्रसंगी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या की," प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध स्वरूपाच्या सुप्त क्षमता असतात. त्या क्षमतांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशाचे शिखर गाठण्यासाठी मेहनत,जिद्द व चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करावा."
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष गोडघासे यांनी केले तर मंगेश तहकीक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .सदर कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण "
Post a Comment