-->

निवडणूक निरीक्षक  व  पोलीस निरीक्षक यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

निवडणूक निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ 


आगामी निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी

निवडणूक निरीक्षक  व  पोलीस निरीक्षक यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा


वाशिम, :आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी तसेच निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्याच्या अनुषंगाने निवडणूक तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृह येथे संपन्न झाली.


सामान्य निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा (भा. प्र. से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि  निवडणूक पोलीस निरीक्षक अल्ताफ खान (भा. पो. से.),  यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी  बुवनेश्वरी एस. , जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे,  अपर जिल्हादंडाधिकारी  विश्वनाथ घुगे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके या बैठकीत  प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत आगामी निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर, संवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

बैठकीदरम्यान निवडणुकीच्या पूर्वतयारीचे सर्व घटक तपासण्यात आले व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.यावेळी पोलीस निरीक्षक अल्ताफ खान यांनी त्यांचा दूरध्वनी क्रमांक 94190 00180 हा असल्याचे त्यांनी कळविले आहे.

0 Response to "निवडणूक निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article