-->

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा

 

साप्ताहिक सागर आदित्य 

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा

निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा 


वाशिम शांत आणि शिस्तप्रिय मतदारांचा जिल्हा


आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून निवडणूक कार्य तंतोतंत पार पाडण्याचे निर्देश


वाशिम जिल्ह्यात निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न


वाशिम,  जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज सामान्य निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकाऱ्यांची आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. वाशिम जिल्हा शांत व शिस्तप्रिय मतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तथापि, सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून निवडणूक कार्य तंतोतंत पार पाडण्याचे निर्देश श्री.झा यांनी दिले.


सामान्य निरिक्षक अनिलकुमार झा यांनी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, गेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील त्यांचा समर्पित प्रयत्न कायम ठेवण्याचे आवाहन केले. निवडणूक काळात सर्व निरीक्षण पथकांनी सजग राहून काम करणे आवश्यक आहे, असे सांगून, सध्या विविध माध्यमांतून होणारी पैशांची बेकायदेशीर उलाढाल थांबवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले.


मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देत, शेवटच्या मतदारापर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात आला. निवडणूक काळात काही उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार टाळण्यासाठी सतर्कता बाळगण्याची सूचनाही यावेळी देण्यात आली.


बैठकीत जिल्हाधिकारी  बुवनेश्वरी एस यांनी वाशिम जिल्ह्यातील मतदान व्यवस्थेबाबत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत मतदान सुरळीत पार पडल्याचे सांगत, या निवडणुकीतही तसाच आदर्श प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.


या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, उपजिल्हाधिकारी श्री. दराडे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, जिल्हा  सुचना व विज्ञान सागर हवालदार, शिक्षणाधिकारी योजना गजानन डाबेराव आदी  उपस्थित होते.


निवडणूक निरीक्षक अनिल कुमार झा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीनंतर सीविजील आणि जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीच्या माध्यम कक्षास भेट दिली. या भेटीदरम्यान जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी यांनी माध्यम कक्षाचा कामकाजाबाबत निवडणूक निरीक्षकांना सविस्तर माहिती दिली. तसेच सिविझिल कक्षात नोडल अधिकारी अजिंक्य वानखेडे यांनी सिव्हिजिल कक्षाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती प्रदान केली.


निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांचे संपर्क साधण्याचे आवाहन


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत पारदर्शकता आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांनी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. निवडणुकीदरम्यान कोणतीही समस्या, शंका किंवा सूचना असल्यास त्यांनी नागरिकांसाठी  भ्रमणध्वनी क्रमांक 7666708756 आणि दूरध्वनी क्रमांक 07252-299382 शेअर केला आहे. निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे अनिलकुमार झा यांनी सांगितले.

0 Response to "मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article