दिवाळीचा फराळ परदेशात पाठवायचा ; मग चिंता नको पोस्ट ऑफिस आहे ना..!
साप्ताहिक सागर आदित्य
दिवाळीचा फराळ परदेशात पाठवायचा ; मग चिंता नको
पोस्ट ऑफिस आहे ना..!
घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध
वाशिम, परदेशातील नातेवाईकांना दिवाळीच्या फराळाचा आनंद घेता यावा म्हणून फराळ
त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी टपाल विभाग याही वर्षी सज्ज आहे. दिवाळीनिमित्त
टपाल विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला असून "फराळाचे पदार्थ दिल्यानंतर ते नाममात्र
किंमतीमध्ये packaging करून माफक दरात परदेशात पाठविण्याची सोय केली आहे. '
दिवाळीचा फराळ करून तयार आहे' पण, तो पाठविण्याचा मुहूर्त लागत नाही, तसेच
आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून टपाल कार्यालयामध्ये येऊ शकत नाहीत अशा
नागरिकांसाठी घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली
आहे. त्यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाच्या पदार्थांचे पार्सल विनामूल्य घेऊन जातील.
नोकरी आणि शिक्षणानिमित्त परदेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
परदेशामध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येकालाच दिवाळीच्या सणासाठी भारतामध्ये येणे शक्य होत नाही. ही बाब ध्यानात घेऊन जगभरातील प्रियजनांना फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पाठवून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नागपूर टपाल विभागाने हे पार्सल परदेशात पोहोचविण्याची जबाबदारी उचलली आहे.
या सेवेचा अधिकाधिक लाभ घेऊन दिवाळी फराळ आपल्या नातेवाईकांना आणि मित्र
मैत्रिणींना पाठवावा. आजपासून ते दिवाळी पर्यंत फ्री पिकअप च्या सेवेसाठी आपण या
क्रमांकावर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत संपर्क करू शकता. वाशिम डाक विभागाच्या
०७२५२ - २३३४९६ या क्रमांकावर आणि विपणन अधिकारी ज्ञानेश्वर होनमणे यांच्या
८००७९०५७०९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अकोला विभागाचे प्रवर डाक अधीक्षक सी.व्ही.रामीरेड्डी यांनी केले आहे.
0 Response to "दिवाळीचा फराळ परदेशात पाठवायचा ; मग चिंता नको पोस्ट ऑफिस आहे ना..!"
Post a Comment