
जिल्हा माहिती कार्यालयात घेतली पंचप्रण शपथ
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा माहिती कार्यालयात
घेतली पंचप्रण शपथ
वाशिम, : " मेरी माटी मेरा देश " हे अभियान भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून आज ९ ऑगस्ट रोजी जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ दिली. यावेळी कार्यालयातील वरीष्ठ लिपीक राजू जाधव, कनिष्ठ लिपीक विजय राठोड, वाहन चालक गजानन डहाके व संदेश वाहक अनिल कुरकुटे यांची उपस्थिती होती.
0 Response to "जिल्हा माहिती कार्यालयात घेतली पंचप्रण शपथ "
Post a Comment