
साक्षी काळे चे निट परीक्षेत सुयश
साप्ताहिक सागर आदित्य
साक्षी काळे चे निट परीक्षेत सुयश
तालुक्यातील भट उमरा येथील रहिवासी कुमारी साक्षी उद्धवराव काळे या विद्यार्थी नीने नीट 2022 परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.या परीक्षेत ती 597 गुण प्राप्त करीत शासकीय वैदयकीय महाविद्यालतील एमबीबीएस साठी पात्र ठरली आहे.साक्षी हिचे शिक्षण इयत्ता सहावी ते दहावीसाक्षी हिचे शिक्षण इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत नवोदय विद्यालय वाशीम येथे पार पडले अकरावी व बारावीचे शिक्षण वसंतराव नाईक विज्ञान आश्रम शाळा किन्हीराजा येथे घेतले.शिवाय साक्षीने कराटे मध्ये राज्यस्तरावरचे सुवर्णपदक पटकावले असून हॉलीबॉल मध्ये एस जी एफ आय मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.तिच्या् यशाबद्दल भट उमरा गावात व परिसरात उत्सवाचे वातावरण आहे.साक्षी बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर दामोदर जी काळे यांची पुतणी असून प्राध्यापक उद्धवराव काळे यांची कन्या आहे.तिच्या यशाबद्दल भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडी तसेच पतंजली योग समिती वाशिम व वारकरी साहित्य परिषद ने आनंद व्यक्त केला आहे.
0 Response to "साक्षी काळे चे निट परीक्षेत सुयश"
Post a Comment