
जिल्हयातील प्रलंबित घरकुले 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा: सीईओ वसुमना पंत
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हयातील प्रलंबित घरकुले 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा: सीईओ वसुमना पंत
जिल्हयातील प्रलंबित घरकुलांची कामे दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी (20) दिले आहेत. त्यानुसार जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी याबात सुक्ष्म नियोजन करुन कृती आराखडा तयार करुन संपुर्ण यंत्रणा कामाला लाघली आहे. येत्या 15 दिवसात जिल्ह्यातील 1324 प्रलंबित घरकुले 100 टक्के पुर्ण करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर, 2022 रोजी राष्ट्रीय आवास दिनापासून ते दिनांक 31 मार्च, 2023 या कालावधीत “अमृत महा आवास अभियान 2022-23” राबविण्यात येत आहे. तसेच दिनांक 17 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयानुसार अभियानास दिनांक 05 जून, 2023 पर्यंत या अभियानास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण सर्वांसाठी घरे-2024 हे राज्य शासनाने देखील स्विकारलेले असून त्यानुसार केंद्र पुरस्कृत "प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण" तसेच राज्य पुरस्कृत "रमाई आवास योजना,शबरी आवास योजना,पारधी आवास योजना,आदिम आवास योजना,अटल बांधकाम कामगार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना" अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राज्यात व “अमृत महा आवास अभियान 2022-23” जिल्हयात दिनांक 20 नोव्हेंबर, 2022 पासून सुरू झालेले आहे व त्यानुसार जिल्हयात विविध उपक्रम आणि प्राप्त उद्दिष्टांनुरूप घरकुल बांधकामे सुरू करण्यात आलेली आहेत.
जिल्हयातील 'प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण' अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना पहिला, दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, परंतू अद्याप सदर घरकूले प्रलंबित (Delayed) आहेत, अशी सर्व घरकूले दिनांक 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे नेतृत्वात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी व गट विकास अधिकारी हे प्रयत्न करित आहेत.
सद्यस्थितीत वाशिम जिल्हयात एकूण 1324 प्रलंबित घरकुले (Delayed Houses) आहेत. या Delayed Houses ची कारणमिमांसा करुन विगतवारी करण्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये गट विकास अधिकारी यांनी पुढाकार घेतला व विशेष मोहीम राबवून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत संपर्क अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे सदरिल Delayed Houses बाबतची इत्यंभूत माहिती घेण्यात आली. या विशेष मोहीमेद्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर ही घरे (Delayed Houses) 15 ऑगस्ट पुर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन गट विकास अधिकारी यांनी केलेले आहे व यात निश्चीत यश मिळण्यासाठी संपूर्ण तालुका स्तरावरील यंत्रणा प्रयत्न करित आहे. त्यासाठी वेळोवेळी लाभार्थ्यांच्या घरकूल बांधकामास भेटी देणे, त्यांना बांधकामासाठी मार्गदर्शन करणे, त्यांचे हप्ते वेळीच मिळतील यासाठी दक्षता घेणेबाबत आवश्यक ती उपाययोजना तालुकास्तरावर करण्यात येत आहे व जिल्हा स्तरावरून त्याबाबत सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व प्रलंबित घरकुले 15 ऑगस्ट पुर्वी पूर्ण करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणेला निर्देश दिले आहेत.
0 Response to "जिल्हयातील प्रलंबित घरकुले 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा: सीईओ वसुमना पंत"
Post a Comment