
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली #परिवहन विभागाचा आढावा घेण्यात आला.
साप्ताहिक सागर आदित्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली #परिवहन विभागाचा आढावा घेण्यात आला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, परिवहन अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,वित्त अपर मुख्य सचिव मनोज सौनिक,महसूल अपर मुख्य सचिव नितीन करीर,परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित.
#एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
संपकाळात सुमारे १० हजारपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते, त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती. त्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहनांची स्थिती, वाहतूक नियमांचे पालन आदी गोष्टींवर भर द्यावा- मुख्यमंत्री
0 Response to "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली #परिवहन विभागाचा आढावा घेण्यात आला."
Post a Comment