-->

पर्युषण पर्व समाप्ति निमित्त शोभा यात्रा चे आयोजन ( वाशिम )जैन स्तंभाजवळील खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर येथे

पर्युषण पर्व समाप्ति निमित्त शोभा यात्रा चे आयोजन ( वाशिम )जैन स्तंभाजवळील खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर येथे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

पर्युषण पर्व समाप्ति निमित्त शोभा यात्रा चे आयोजनपर्व ( वाशिम )जैन स्तंभाजवळील खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर येथे     पर्युषण     पर्व महोत्सव मोठ्या उत्साहाने, भगवंताच्या विधीवत अभिषेक, पूजन ,सांस्कृतिक कार्यक्रमाने भजन, करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .पर्युषन या शब्दाचा अर्थ म्हणजे मनातील सर्व विकारांचे शमन करणे, काम, क्रोध ,वैमनस्व या विकारापासून दूर राहून स्वतःला शांती प्राप्त करून घेणे ।जैन धर्मातील काही महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सवांमध्ये पर्युशन परवाचे एक वेगळे महत्त्व आहे. पर्युषण पर्व सुरू होण्यापूर्वी जैन बांधवांनी सर्व धार्मिक स्थळांची साफसफाई पूर्ण केली। जैन समाजात पर्युषण पर्व ला सर्वात मोठे पर्व मानल्या जाते .या पर्वात अहिंसा ,सत्य ,असतेय (चोरी न करणे )ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचे समावेश आहे   . पर्युषण पर्व समाप्ती निमित्त वाशिम शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भव्य रथ  ,    त्यावर भगवंताची विशाल प्रतिमा ,बँड पथक, उपस्थित स्त्रियांनी केसरी साडी पुरुषांनी पांढरे कपडे परिधान करून भगवंताच्या जय जयकार करत शिस्तबद्ध चालक लोकांना आकर्षित करीत होते .भगवंताच्या जयकाराने परिसर भक्तीमय झाला होता. मिरवणूक बाळू चौक , सुभाष चौक ,टिळक चौक, दंडे चौक, जुना नगरपरिषद रोड मार्गे जैन मंदिराजवळ समापन करण्यात आले भगवंताच्या आरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता जैन सोशल ग्रुप ,   जैन नवयुवक मंडळ ,देशना महिला मंडळ च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

0 Response to "पर्युषण पर्व समाप्ति निमित्त शोभा यात्रा चे आयोजन ( वाशिम )जैन स्तंभाजवळील खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर येथे "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article