-->

प्रधानमंत्री पीक विमा योजना  ‘माझी पॉलीसी माझ्या हाती’या उपक्रमातंर्गत  हिवरा (रोहिला)येथे पॉलीसीचे वितरण

प्रधानमंत्री पीक विमा योजना ‘माझी पॉलीसी माझ्या हाती’या उपक्रमातंर्गत हिवरा (रोहिला)येथे पॉलीसीचे वितरण

 


साप्ताहिक सागर आदित्य 

प्रधानमंत्री पीक विमा योजना

‘माझी पॉलीसी माझ्या हाती’या उपक्रमातंर्गत

हिवरा (रोहिला)येथे पॉलीसीचे वितरण

वाशिम,  प्रधानमंत्री  पीक विमा योजनेअंतर्गत सन 2022-23 च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या पॉलीसीची पावती हिवरा (रोहीला) येथे 12 सप्टेंबर रोजी आमदार लखन मलीक यांच्या हस्ते या योजनेअंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली. यावेळी  जिल्हा परिषद सदस्य दिलीप देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य चरण गोटे, हिवरा सरपंच गजानन देशमुख व ॲग्रीकलचर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक  सोमेश देशमुख यांची  प्रामुख्याने उपस्थिती होती.

या उपक्रमाअंतर्गत आयोजित  कार्यशाळेत हिवरा (रोहीला) येथील 170 शेतकऱ्यांना माझी पॉलीसी  माझ्या हाती च्या  पावत्या देण्यात आल्या. यावेळी पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक सोमेश देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची  माहिती  देवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  या योजनेत सहभागी  होण्याचे आवाहन केले.



Related Posts

0 Response to "प्रधानमंत्री पीक विमा योजना ‘माझी पॉलीसी माझ्या हाती’या उपक्रमातंर्गत हिवरा (रोहिला)येथे पॉलीसीचे वितरण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article