श्री.पांडुरंग विद्यालयात सायबर क्राईम मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न पिंपळा
साप्ताहिक सागर आदित्य
श्री.पांडुरंग विद्यालयात सायबर क्राईम मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
पिंपळा:- येथील श्री. पांडुरंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, येथे आज दिनांक १८ऑगस्ट २०२२ रोजी पुणे येथील ग्यानकी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने सायबर क्राईम मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.एन. देशमुख सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवघरे ,ग्यानकी स्वयंसेवी संस्था. पुणे हे होते.
यावेळी संस्थेचे नवघरे यांनी, विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले मोबाईलचा अतिवापरामुळे व विविध प्रकारच्या ॲप्स द्वारे ऑनलाईन फसवणूक कशाप्रकरे होते. याबद्दल विद्यार्थ्यांना विविध स्लाईड शो व व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, आजकाल सर्वजण व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ,ट्विटर हे वापरताना अनोळखी व्यक्ती सोबत झालेली मैत्री ही किती महागात पडू शकते व त्यामुळे आपल्याकडील वैयक्तिक माहिती घेऊन आपली कशी फसवणूक होते,याबद्दल मार्गदर्शन केले.पुढे ते म्हणाले की, आपण आपली वैयक्तिक माहिती जसे आधार क्रमांक, बँकेचे अकाउंट, पॅन कार्ड नंबर, पासवर्ड कुणालाही सांगू नये तसेच आपण काय करतो, कुठे जातो ही माहिती पोस्ट करताना आपल्या ओळखीच्या माणसांनाच ती दिसेल याबद्दलची मोबाईल मध्ये सेटिंग करून घ्यावी जेणेकरून आपली फसगत होणार नाही व आपल्यामध्ये नैराश्य निर्माण होऊन आपल्याकडून सायबर क्राईम होणार नाही व त्याचे आपण बळी पडणार नाही व आपले शैक्षणिक नुकसान होणार नाही.याची दक्षता घ्यावी.
विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व वेळप्रसंगीच मोबाईलचा वापर करावा व अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे हे त्यांनी सांगितले.विद्यालयातील विद्यार्थ्यांना येत असलेल्या सर्व समस्या बद्दल मार्गदर्शकांना प्रश्न विचारले व नवघरे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. डी.भिंगे सर तर आभार प्रदर्शन एस.बी.देशमुख सर यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी बहूसंख्येने उपस्थित होते.
0 Response to " श्री.पांडुरंग विद्यालयात सायबर क्राईम मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न पिंपळा"
Post a Comment