-->

विभागातील सर्व तालुक्यांत पाऊस    यवतमाळ जिल्ह्यात 55.3 पावसाची नोंद

विभागातील सर्व तालुक्यांत पाऊस यवतमाळ जिल्ह्यात 55.3 पावसाची नोंद

  


साप्ताहिक सागर आदित्य 

विभागातील सर्व तालुक्यांत पाऊस 

 यवतमाळ जिल्ह्यात 55.3 पावसाची नोंद 

अमरावती,  : अमरावती विभागातील 56 तालुक्यांत पाऊस झाला. विभागात यवतमाळ जिल्ह्यात 55.3 मिमि व बुलढाणा जिल्ह्यात 6.8 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 29.2 मिमि पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 562.2 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

   विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.

अमरावती जिल्हा : धारणी 10.4 (541.6), चिखलदरा 17.3 (842.2), अमरावती 33.1 (463.5), भातकूली 27.4 (376.0), नांदगाव खडेश्वर 43.1 (594.3), चांदूर रेल्वे 26.9 (501.9), तिवसा 24.7 (659.2), मोर्शी 35.5 (571.6), वरुड 92.0 (705.4), दर्यापूर 17.2 (357.8), अंजनगाव 11.2 (413.6), अचलपूर 18.0 (424.5), चांदूरबाजार 21.5 (619.4), धामणगाव रेल्वे 32.3 (704.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 30.7 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 545.7 मि.मि. पाऊस झाला.

अकोला जिल्हा :- अकोट 12.1 (304.8), तेल्हारा 14.8 (409.1), बाळापूर 12.8 (506.2), पातूर 4.9 (427.1),  अकोला 7.9 (466.0), बार्शी टाकळी 11.0 (416.6), मुर्तीजापूर 19.2 (377.1), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 11.8 मि.मि. तर आजवर 416.8 मि.मि पाऊस झाला आहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 1.8 (327.8), संग्रामपूर 9.4 (396.5), चिखली 7.9 (470.8), बुलडाणा 6.1 (576.6), देऊळगाव राजा 9.1 (457.5), मेहकर 4.1 (485.5), सिंदखेड राजा 13.7 (531.4), लोणार 18.8 (445.5), खामगाव 2.1 (340.0), शेगाव 8.8 (435.3), मलकापूर 1.3 (295.7), मोताळा 1.9 (330.2), नांदूरा 2.4 (340.3), जिल्ह्यात दिवसभरात 6.8 तर यंदाच्या हंगामात आजवर 423.8 मि.मि. पाऊस झाला.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 44.1 (684.9), बाभूळगाव 50.4 (733.1), कळंब 83.9 (774.8), दारव्हा 29.8 (547.3), दिग्रस 50.6 (683.2), आर्णी 65.8 (854.0), नेर 32.0 (603.6), पुसद 29.5 (539.9), उमरखेड 37.4 (707.6), महागाव 21.0 (735.2), वणी 61.3 (943.4), मारेगाव 100.4 (927.4), झरीजामणी 82.9 (878.7), केळापूर 75.5 (860.4), घाटंजी 74.4 (751.0), राळेगाव 81.9 (912.2), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 55.3 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 752.0 मि.मि पाऊस झालाआहे.

वाशिम जिल्हा : - वाशिम 26.1 (557.3), रिसोड 28.9 (589.2), मालेगाव 24.8 (630.9), मंगरुळपिर 31.7 (627.7), मानोरा 24.8 (659.7), कारंजा 27.0 (432.7), जिल्ह्यात 24 तासात 27.2 तर 1 जूनपासून आजवर 578.2 मि.मि. पाऊस झाला.







0 Response to "विभागातील सर्व तालुक्यांत पाऊस यवतमाळ जिल्ह्यात 55.3 पावसाची नोंद "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article