भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन :-
साप्ताहिक सागर आदित्य
भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन :-
आज दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शालेय शिक्षण परिपत्रकानुसार 'हर-घर तिरंगा'या उपक्रमाच्या निमित्ताने भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये पूर्व माध्यमिक वर्ग ५ ते ७, माध्यमिक वर्ग ८ ते १०,उच्च माध्यमिक वर्ग ११ व १२ विज्ञान,कला व वाणिज्य तसेच वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय भाग १,२ व ३ असे जवळपास ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या रॅलीचे उदघाटनाचा कार्यक्रम स्व.विठ्ठलरावजी देशमुख सभागृहामध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य राजेश नंदकुले उपस्थित होते, प्रमुख उपस्थिती मध्ये शाळेचे विश्वस्त उकळकर साहेब, रिसोड शहराच्या नगराध्यक्षा सौ.विजयमाला आसनकर मॅडम,नायब तहसीलदार लटके साहेब, उपप्राचार्य पवार सर, पर्यवेक्षक भांडेकर सर,विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य काटे सर, त्याचबरोबर देशाकरिता सीमेवर सेवा दिलेले १५ ते २० माजी सैनिक यावेळी मंचावर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रेरणेतून व संस्थेचे सचिव युवानेते नकुलदादा, विश्वस्त सौ.बाईसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचाच भाग म्हणून देशाकरिता सेवा देणाऱ्या माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जवळपास १५ ते २० माजी सैनिक उपस्थित होते.
त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य नंदकुले सर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, घर-घर तिरंगा, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सर्वांनी आपल्या घरी राष्ट्रध्वजाची संहिता पाळून १३,१४ व १५ तारखेला तिरंगाध्वज उभारावा,तसेच आपापल्या परिसरातील सर्व नागरिकांना याविषयी माहिती देऊन जनजागृती करावी, याबद्दल आवाहन केले. त्याचबरोबर माजी सैनिकांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर माजी सैनिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केलं.
त्यानंतर प्राचार्य ,विश्वस्त व मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सरनाईक, जगन्नाथ ठोंबरे यांनी आपले सैन्यातील अनुभव सांगितले व १६ ऑगस्टला रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचा आवाहन केले.
मान्यवरामध्ये विश्वस्त उकळकर साहेब, सौ.आसनकर मॅडम व लटके साहेब यांची भाषणे झाली. वसंत जुमडेनीं देशभक्तीपर गीत सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डी. एन. देशमुख सरांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका प्राध्यापक, प्राध्यापिका व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी अनेक पालक विद्यार्थी ,विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
0 Response to "भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन :-"
Post a Comment