साप्ताहिक सागर आदित्य/
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे आज राजश्री शाहू महाराजांना आदरांजली.
वाशिम - श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास विभाग व सांस्कृतिक विभागा तर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य उद्धव जमदाडे उपस्थित होते. सर्वप्रथम राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी राजश्री शाहू महाराजांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली .सदर कार्यक्रमाला डॉ संदीप शिंदे, डॉ अरविंद बहोरपी, डॉ. प्रशांत बुकणे, डॉ देवानंद आंभोरे, डॉ अतुल राऊत, प्रा दिगंबरकुमार लांडगे, प्रा. उद्धव बनकर, प्रा. अशोक वाघ, प्रा. ज्ञानेश्वर गोरे, प्रा. रवींद्र इंगोले, प्रा.सचिन इंगोले, डॉ. रवींद्र मडावी, डॉ. सुनिता राठोड, डॉ. पूर्णिमा संधानी, डॉ. उन्मेश घुगे,डॉ. शितल उजाडे, प्रा. कोमल पतंगराव, ग्रंथपाल वर्षा इंगळे, प्रा. ज्ञानेश्वर पवार, प्रा. अश्विन काकडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे आज राजश्री शाहू महाराजांना आदरांजली."
Post a Comment