-->

परिवर्तनाची दिशा देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज - गोपाल भिसडे

परिवर्तनाची दिशा देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज - गोपाल भिसडे


साप्ताहिक सागर आदित्य/

परिवर्तनाची दिशा देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज - गोपाल भिसडे


आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे,वसतिगृहांची चळवळ उभी करणारे,अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद दूर करण्यासाठी,स्त्रियांचे शिक्षण
व हक्कासाठी आपल्या राज्यात कायदे करणारे,सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ शिक्षण प्रसार आणि बहुजन समाजाच्या विकासासाठी शैक्षणिक व सामाजिक सुधारणांद्वारे शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती घडवली. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्रे उभारून त्यांना स्वयंरोजगाराचा मार्ग दाखवला. स्त्री शिक्षण, जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्यातून समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज
#लोकाभिमुख_राजा !

   "राजर्षी"  या पदवीलाही उंच  करेल असे नाव म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

●संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व !

●सामाजिक परिवर्तन, दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी आयुष्य झोकून देणारे व्यक्तिमत्व !

●शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला शिकण्याची प्रेरणा आणि जाणीव करून देणारे व्यक्तिमत्व !

●अस्पृश्य आणि वंचित समाजातील लोकांसाठी  स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी आणि  दुकाने सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व !

 ●जातिभेदाला विरोध करून समाजातील सर्व वर्गांची प्रगती व्हावी म्हणून ते सदैव झटत राहणारे व्यक्तिमत्व !

●स्वातंत्र्यपूर्व आधी कितीतरी वर्षांपूर्वी समता, बंधुता आणि  धर्मनिरपेक्षता या घटकाची अंमलबजावणी करणारे  व्यक्तिमत्व !

●संगीत , गायन , वादन , कुस्ती आणि  इतर कलांसाठी  राजाश्रय देणारे व्यक्तिमत्व !
 
"  लोकाभिमुख राजा म्हणजेच 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांना मानाचा मुजरा !! "

#छत्रपतीराजर्षीशाहूमहाराज
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी निम्मित विनम्र अभिवादन..

 

 




Related Posts

0 Response to "परिवर्तनाची दिशा देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज - गोपाल भिसडे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article