-->

राठी विधी महाविद्यालयाचे कायदेविषयक शिबीर उत्साहात

राठी विधी महाविद्यालयाचे कायदेविषयक शिबीर उत्साहात


साप्तहिक सागर आदित्य/

राठी विधी महाविद्यालयाचे कायदेविषयक शिबीर उत्साहात

वाशिम - कायदयाची सर्वसाधारण माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचविणे तसेच लोकांच्या दैनंदिन उपयोगाचे कायदे सोप्या भाषेत त्यांना समजावुन सांगणे या उद्देशाने येथील अ‍ॅड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयातर्फे गुरुवार, 5 मे रोजी तालुक्यातील आसोला जहागीर येथे आयोजीत कायदेविषयक शिबीराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.
    शिबीराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुशांत चिमणे तर प्रमुख अतिथी म्हणुन सरपंच इंदुबाई बरडे, पोलीस पाटील विठ्ठल बरडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन बरडे, साहेबराव सुर्वे, कृषीसेवक सुभाष बरडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गायकवाड, दिपक बरडे, संतोष इंगोले, गोरखनाथ बरडे, उध्दव बरडे, सुधाकर इंगोले, देवराव खडसे, हभप केशव इंगोले, उध्दव बरडे, बब्बु पठाण आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
    विधी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील एक प्रात्याक्षिक शिक्षणाचा भाग म्हणुन अशा कायदेविषयक उपक्रमांचे आयोजन विधी महाविद्यालयातर्फे करण्यात येते. कायदयाचे शिक्षण व ज्ञान मिळविणे आजच्या परिस्थीतीत महत्वाचे आहे. कायदयाची गरज केव्हाही पडु शकते तेव्हा सर्व नागरीकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य व समन्वयक प्रा. डॉ. सुशांत चिमणे यांनी सांगीतले. यावेळी ग्राहक संरक्षण कायदा, पर्यावरण कायदा, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, महिलांचे अधिकार, अटक झालेल्या व्यक्तींचे अधिकार, स्त्रीभ्रूण हत्याविरोधी कायदा, पोटगीचा कायदा अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. डॉ. सागर सोनी, अ‍ॅड. सज्जनसिंह चंदेल, प्रा.डॉ. प्रियंका चौधरी यांनीही गावकर्‍यांना कायदयाची जुजबी माहिती दिली. विधी महाविद्यालयात मोफत कादेविषयक सल्ला केंद्र असुन गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकर्‍यांना करण्यात आले. विधी विद्यार्थ्यापैकी कोमल मड्डी, अपेक्षा राऊत, उमेश माहुले, राहुल रोकडे, पुजा वानखेडे, सुशिल भिमजियाणी, रामेश्वर शेळके, हनुमान मुटकुळे, चंद्रकांत हटकर, विजय कंगाले, लक्ष्मण बिटोडे, शाहीदखान, गजनफर खान, रमेश गंगाखेडे, गणेश वानखेडे, सुनिता बागले आदी विद्यार्थ्यांनी कायदयाच्या माहिती पत्रकाचे घरोघरी जावुन वितरण केले. सदर शिबीरातुन कायदयाची माहिती जनमानसात पोहचविल्याने सामाजिक कार्यात भर पडले असे कौतुकोद्गार राजस्थान शिक्षण मंडाळाच्या अध्यक्षा शिलाताई राठी यांनी काढले. शिबीरात चौथ्या व सहाव्या सत्राच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग नोंदविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. भाग्यश्री धमाळे, संचालन व आभारप्रदर्शन सुशिल भिमजियाणी यांनी केले.

 




Related Posts

0 Response to "राठी विधी महाविद्यालयाचे कायदेविषयक शिबीर उत्साहात"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article