जलशक्ती अभियानातंर्गत कॅच द रेन मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
साप्ताहिक सागर आदित्य/
जलशक्ती अभियानातंर्गत कॅच द रेन मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
वाशिम - जलशक्ती अभियानातंर्गत कॅच द रेन मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 12 मे रोजी वाकाटक सभागृहात आयोजित सभेत घेतला. सभेत तालुकानिहाय आराखडयाबाबत चर्चा करण्यात आली. तालुकानिहाय आराखडयामध्ये सर्व विभागाचा समावेश असल्याची माहिती यावेळी उपस्थित गटविकास अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन म्हणाले, हा आराखडा अंतिम राहणार आहे. जेवढे कामे करणे शक्य होणार आहे. तेवढयाच कामाचा समावेश आराखडयामध्ये करण्यात यावा. नगर पालीका क्षेत्रात या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त कामे करण्यात यावी. त्यामुळे पावसाळयात छतावर पडणाऱ्या पाण्याचे भूगर्भात मोठया प्रमाणात संकलन करता येईल. ही कामे उदयापासून सुरु व्हावीत. शोषखड्डे व पाण्याच्या पुनर्भरणाची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी. कामे करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत असल्यास मृद व जलसंधारण विभागाकडे त्याबाबत विचारणा करावी. असे षण्मुगराजन यावेळी म्हणाले.
सभेला जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी ठोंबरे, नगर पालीका प्रशासन अधिकारी दिपक मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी, वाशिमचे गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, कारंजा गटविकास अधिकारी मोहन श्रृंगारे, मानोरा गटविकास अधिकारी परिहार, रिसोड गटविकास अधिकारी सोळंके यांचेसह सर्व तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती. हुमणे यांनी सादरीकरणातून मोहिमेची माहिती दिली.




0 Response to "जलशक्ती अभियानातंर्गत कॅच द रेन मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा"
Post a Comment