
चांडस ते नावली रस्त्यांचे काम ठप्प
साप्ताहिक सागर आदित्य/
नंधाना - चांडस ते नावली रस्ताचे काम २०१९ पासुन चालु झाला आहे. आणि या रस्ताला ४ वर्ष होऊन सुध्दा रस्ता पुर्ण झाला नाही. या रस्तामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. रस्ताने जायचे कसे सुध्दा कळत नाही. आता पावसाळ्यामध्ये पाण्याने खड्डे भरणार अपघातच प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या रस्ताचे काम झाले नाही काही जर दुर्घटना झाली तर याला स्थानिक प्रतिनिधी , सरकारी अधिकारी , ठेकेदार सर्व हे सर्व जण जबाबदार राहतील. तसेच अधिकरी , ठेकेदार , स्थानिक प्रतिनिधी ,यांना जागृत करण्यासाठी नंधाना , जांब अढाव , कोयाळी बु. , नावली , खेड्यातील मंडळीना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे म्हणून आज सर्व गावकरी मंडळीच्या मोठ्या उत्साहात हस्ते लोकअर्पण सोहळा पार पाडला.
0 Response to "चांडस ते नावली रस्त्यांचे काम ठप्प"
Post a Comment