
जावयाने कोयत्याने केली सासूसह मेव्हणीची हत्या, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार
साप्ताहिक सागर आदित्य/
जावयाने कोयत्याने केली सासूसह मेव्हणीची हत्या, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार
मंगरुळपीर : संपत्तीच्या वादातून जावयाने सासू व मेव्हणीची कोयत्याने हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे घडली आहे. निर्मलाबाई भिकाजी पवार (वय ६५) रा शेलुबाजार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे (वय ४०) रा जिंतूर जि परभणी, अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवार १३ मे रोजी सकाळी आरोपी सचिन धर्मराज थोरात (वय ४२) ,रा जनता वसाहत पुणे याचा सकाळच्या सुमारास सासू निर्मलाबाई भिकाजी पवार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे यांच्याशी संपत्तीवरून वाद झाला. वाद वाढत गेल्याने आरोपी सचिन धर्मराज थोरात याने सासू निर्मलाबाई भिकाजी पवार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात दोघींचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार सुनील हुड यांचे मार्गदर्शनात एपीआय मंजुषा मोरे, एएसआय अनिरुद्ध भगत, हेकॉ ज्ञानेश्वर राठोड,पोकॉ संदिप खडसे,गोपाल कव्हर, अंकूश मस्के यांनी घटनास्थळ गाठून आरोपीस अटक केली, तसेच आरोपीवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय मंजुषा मोरे करीत आहेत.
0 Response to "जावयाने कोयत्याने केली सासूसह मेव्हणीची हत्या, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार"
Post a Comment