
29 मे रोजी कंत्राटी शिक्षक पदांसाठी लेखी परीक्षा
साप्ताहिक सागर आदित्य/
29 मे रोजी कंत्राटी शिक्षक पदांसाठी लेखी परीक्षा
वाशिम- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांच्या अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये कला आणि संगणक शिक्षक या कंत्राटी पदांकरीता 24 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत आवेदन अर्ज मागवीले होते. कला शिक्षक या पदासाठी 144 आणि पाच अंशकालीन पदवीधर उमेदवारांसह एकूण 149 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहे. संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार पात्र ठरले. या दोन्ही कंत्राटी पदासाठी 29 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता अकोला येथील सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिव्हील लाईन येथे ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरुप 100 प्रश्न असून प्रती प्रश्न 2 गुण असे एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा होईल. यामध्ये कंत्राटी कला शिक्षक पदाच्या लेखी परीक्षेकरीता सामान्य ज्ञान 70 प्रश्न व कला शिक्षक डिप्लोमा अर्हतेवर आधारीत 30 प्रश्न असतील. कंत्राटी संगणक शिक्षक पदाच्या लेखी परीक्षेकरीता सामान्य ज्ञान 70 प्रश्न आणि संगणक विषयासंदर्भात 30 प्रश्न राहतील.
वरील परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना आवेदन पत्रात नमुद केलेल्या पत्त्यावर नोंदणीकृत पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना 24 मे पर्यंत प्रवेशपत्र प्राप्त होणार नाही त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला, महसूल भवन इमारत, माहेश्वरी भवनाजवळ, न्यु. राधाकिसन प्लॉट, अकोला येथे कार्यालयातून 25 व 26 मे यादिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.
0 Response to " 29 मे रोजी कंत्राटी शिक्षक पदांसाठी लेखी परीक्षा "
Post a Comment