
बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशिम- जिल्ह्यामध्ये मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी असल्याने बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन वाशिम तालुकास्तरावर करण्यात आले होते. यामध्ये सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका , अंगणवाडी परिक्षेत्रातील लाभार्थी ,गरोदर, स्तनदा माता, किशोरी मुली यांना मार्गदर्शन करण्यात आले . राष्ट्रमाता जिजाऊ व लोकमाता सावित्री यांचे प्रतिमापूजनने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रत्यक्ष मार्गदर्शनाच्या कार्यक्रमापूर्वी परिक्षेत्रातील किशोरी मुलींसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले चित्रकला स्पर्धेतून प्रथम क्रमांक प्राप्त मुक्त वानखडे द्वितीय क्रमांक प्राप्त प्रगती सेबेवार यांचे अभिनंदन करण्यात आले व रांगोळी स्पर्धेतून प्रथम क्रमांक प्राप्त पल्लवी भिसे व द्वितीय क्रमांक प्राप्त केतकी परळकर यांचे सुद्धा अभिनंदन व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाकरिता बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा स्तरीय समिती सदस्य श्रीमती सोनालीताई ठाकूर व स्त्रीरोगतज्ञ अलका मकासरे 2017 मध्ये वाशिम ते जम्मू सायकल रॅली करणाऱ्या रेखाताई रावले, योग प्रशिक्षक व महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राध्यापक श्रीमती दीपा ताई वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्ष बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भस्मे आयोजक पर्यवेक्षिका श्रीमती चिटणीस तथा प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीमती गांजरे यांनी केले कार्यक्रमामध्ये सेविकांच्या एका गटाने बेटी बचाव विषयाच्या अनुषंगाने सुंदर ओवी सादर केल्या. पहिल्या मुलीचे स्वागत करणाऱ्या मातेचे तसेच दोन मुलीवर ऑपरेशन करणाऱ्या अर्चना अन्सिंगकर ताई यांचे स्वागत करून मुलींचे स्वागत व दोन मुलीवर ऑपरेशन या घटनांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याबाबत प्रवृत्त केले. मुला-मुलींना लिंग भेद न ठेवता समान सर्वांगीण विकासाची संधी व वागणूक देणे ही आजच्या काळाची गरज असून प्रत्येकापर्यंत हा संदेश पोहोचविण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका यांनी घेतली. तसेच त्याकरिता उपस्थित सर्व संकल्प बद्ध झालेत. मुलींचे प्रमाण वाढविण्याकरिता व समाजात त्यांना मानाचे स्थान मिळण्याकरिता सर्व स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन जागरूकतेने चांगल्या मानसिकतेने काम करण्याची, स्वतःमध्ये काही बदल घडविण्याची गरज असल्याचे, तसेच प्रत्येक मुला-मुलींना स्वसंरक्षणासाठी सज्ज राहण्याचे प्रमुख वक्ते व अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून मत मांडले. एक सुंदर भविष्यकाळ उद्या घडविण्यासाठी सर्व कटिबद्ध झालेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका बुंदे यांनी केले.
0 Response to "बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन"
Post a Comment