-->

करंजी येथील युवकाची आत्महत्या

करंजी येथील युवकाची आत्महत्या


साप्ताहिक सागर आदित्य/

मालेगाव - तालुक्यातील करंजी येथील युवक मदन सुभाष विढोळे वय २८ वर्ष यांनी आज दिनांक १७ मार्च रोजी भगवान नारायण विढोळे यांच्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रथम दर्शनी निदर्शनास आले.

घटनेची माहिती प्रमोद सोपान विढोळे यांनी शिरपूर पोलिस स्टेशन ला दिली.सदर घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक महादेव भारसाकळे, बिट जमादार भीमराव गवई, पोलिस कॉन्स्टेबल गणेश देशमुख, महेबूब परसुवाले,यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे पाठविण्यात आले. मयत मदन विढोळे हा तरुण असून आई वडिलांना एकटेच होते,त्यांना ३ महिन्याची मुलगी,पत्नी ,बहीण असा परिवार आहे, मयत हा शेती करीत असून त्यांच्या नावावर बँकेचे कर्ज असल्याचे समजते,आत्महत्येचे नेमके कारण अजून समजले नसून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत, ऐन होळी च्या दिवशी सदर घटना घडल्या मुळे करंजी गावावर शोककळा पसरली आहे.

0 Response to "करंजी येथील युवकाची आत्महत्या"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article