जिल्ह्यातील ६३ गावात कलावंतांनी केला राज्य सरकारच्या दोन वर्षातील जनकल्याणकारी योजनांचा जागर
साप्ताहिक सागर आदित्य/
जिल्ह्यातील ६३ गावात कलावंतांनी केला राज्य सरकारच्या दोन वर्षातील जनकल्याणकारी योजनांचा जागर
वाशिम दि.१६ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या सरकारने दोन वर्षाच्या काळात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, राबविलेल्या योजना व उपक्रमांची माहिती ९ ते १६ मार्च दरम्यान जिल्ह्यातील ६३ गावात तीन कलापथकातील कलावंतांनी लोककलांच्या माध्यमातून उपस्थित ग्रामस्थांना दिली.
या कार्यक्रमाला विविध गावात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,सरपंच उपसरपंच,पोलीस पाटील,अधिकारी, मुख्याध्यापक,ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील विद्यार्थी,बचत गटांच्या महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कलावंतानी राज्य शासनाने दोन वर्षात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व योजनांची माहिती उपस्थितांना देऊन राज्य शासनाने वाशिम येथे राज्यातील पहिले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्याचा निर्णय घेऊन त्या संकुलाचे काम वेगाने पूर्ण होत असल्याचे सांगितले.सोबतच शिवभोजन योजना,महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना,जल जीवन मिशन,स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यासह अन्य योजनांची माहिती आपल्या कलापथक सादरीकरणातून कलावंतांनी दिली. उपस्थितांना सर्वसाधारण योजनेवर तयार केलेल्या दूरदृष्टी या घडीपुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
0 Response to "जिल्ह्यातील ६३ गावात कलावंतांनी केला राज्य सरकारच्या दोन वर्षातील जनकल्याणकारी योजनांचा जागर"
Post a Comment