-->

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिमचे मा.आमदार मा.गृहमंत्री रणजीत पाटील आणि आमदार अमित झनक  यांना निवेदन

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिमचे मा.आमदार मा.गृहमंत्री रणजीत पाटील आणि आमदार अमित झनक यांना निवेदन


साप्ताहिक सागर आदित्य/

वाशिम  - अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिम जिल्हा  अध्यक्ष राजेश पाटील सिरसाट व सचिव दत्तात्रय भिसडे व सर्व योगशिक्षक,योग साधक  यांनी 11 सुत्रिय मागणी पत्र मा.आमदार मा.गृहमंत्री रणजीत पाटील आणि आमदार अमित झनक  यांना निवेदन सादर केले
अ.भा.यो. शि महासंघाच्या योगशिक्षक हिताच्या ११ मागण्या मान्य करण्यास विनंती बाबत सदृढ ठेवण्यासाठी महोदय , समाजाला आणि देशाला स्वास्थ बनविण्यासाठी योगसाधनेशिवाय पर्याय नाही . म्हणून अ.भा.यो. शि महासंघाच्या वतीने योग संपूर्ण देशात योगसाधनेबाबत जनजागृती सोबत समाजाला स्वास्थ आणि योगशिक्षक अहोरात्र झटत आहे . मात्र आजपर्यंत योगशिक्षकांच्या पदरी निराशाच पडली आहे. म्हणून आम्ही शासन दरबारी योगशिक्षकांच्या ११ मांडल्या आहेत.

१ ) एम.पी.एस.सी. ( MPSC ) मध्ये योगविषयाला ऐच्छिक विषय म्हणून मान्यता द्यावी . 

२ ) शाळा व महाविद्यालयात योग विषयास मुख्य विषय म्हणून मान्यता . 

३ ) महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धिनी मार्फत योगसत्र आणि शिक्षकास नियमित करावे तथा मानधन वाढवून द्यावे . 

४ ) शासकीय व निमशासकीय आस्थापना मध्ये योगा ब्रेक नियमित करावा यासाठी एक तज्ज्ञ योग शिक्षक नेमावा .

 ५ ) योग विषयास सेट ( SET ) परीक्षेत सामील करावे .

 ६ ) महाराष्ट्र पोलीस खात्यात योग शिक्षक नियमित करावा . 

७ ) जिल्हा सामान्य रुग्णालयात योग थेरेपिस्टच्या जागा भराव्यात 

८ ) ग्रामीण तथा शहरी भागातील २० वर्षांपासून निःशुल्क सेवा देणाऱ्या योगशिक्षकास लोककलावंता प्रमाणे मानधन द्यावे.

 ९ ) योग विषयाला पूर्णतः अनुदानित करावे. 

१० ) योग विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फेलोशिप प्रदान करावी . 

११ ) मराठी साहित्य संमेलन प्रमाणे दरवर्षी योग संमेलनचे शासनाने आयोजन करावे अथवा त्याकरिता संघटनेस अनुदान देण्यात यावे. 

अशा सर्व मागण्या मान्य कराव्या व योगशिक्षकांना उचित न्याय द्यावा.  ह्या सर्व मागण्या त्वरित मान्य न झाल्यास संघटनेतर्फे प्रखर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

 





0 Response to "अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिमचे मा.आमदार मा.गृहमंत्री रणजीत पाटील आणि आमदार अमित झनक यांना निवेदन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article