-->

एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण

एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण


साप्ताहिक सागर आदित्य/

एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण

आमखेडा: गीताई  ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड  कृषि महाविद्यालय ( अहिंसा तिर्थ)आमखेडा ता मालेगाव जि वाशिम येथे एक विद्यार्थी-एक वृक्ष या संकल्पनेनुसार .एस नाथन संस्थापक वृक्ष क्रांती मिशन अकोला यांच्या हस्ते वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात वृक्ष त्यांच्या सोयीच्या ठिकाणी जेथे वृक्षाचे संगोपन  ते चांगल्या प्रकारे करतील अशा ठिकाणी लावावे. त्या वृक्षाला स्वतःचे नाव देऊन त्यासोबत आपला वाढदिवस साजरा करावा असे  एस नाथन यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला  संतोष बाबाराव जोगदंड, महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. एस एम जाधव, डॉ. जी एच , डॉ. आर एस करंगामी, प्रा एस टी कव्हर, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी  कोरोणाच्याच्या नियमाचे पालन करून उपस्थित होते.






0 Response to "एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article