-->

भूमिपुत्रच्या प्रयत्नाने सावरगांवच्या शेतकऱ्यांना मिळाला न्याय

भूमिपुत्रच्या प्रयत्नाने सावरगांवच्या शेतकऱ्यांना मिळाला न्याय

 


साप्ताहिक सागर आदित्य/

भूमिपुत्रच्या प्रयत्नाने सावरगांवच्या शेतकऱ्यांना मिळाला न्याय

 वाशिम:  अकोला -नांदेड महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या मॉंटोकार्लो कंपनीने तालुक्यातील सावरगाव बरडे येथील शेतकऱ्यांच्या जमीनी बेसकॅम्प करीता भाड्याने घेतल्या होत्या. मात्र सुरवातीचा तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुढील करार करण्यावरून शेतकरी व कंपनीत वाद निर्माण झाला होता.  यावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.

सावरगाव येथील शेतकरी व कंपनी यांच्या दरम्यान झालेला करार २५ ऑक्टोंबर २०२१ रोजीच संपुष्टात आला होता. व पुढील करार करताना मोबदला वाढवून देण्याची शेतकऱ्यांनी कंपनीकडे मागणी केली होती. मात्र कंपनी यासाठी तयार होत नव्हती व महामार्गाचे काम बाकी असल्याने कंपनी जमिनीही खाली करून देत नव्हती अश्यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले होते. मात्र  तोडगा निघू शकला नव्हता. पुढे हे प्रकरण कोर्टात जाण्याच्या मार्गात असतांना विष्णुपंत भुतेकर यांनी कंपनीचे वकील अॅड श्यामराव उंडाळ, API विनोद झळके ठाणेदार ग्रामीण पो. स्टे. वाशिम, हे.पो.काॅ. आडे, पो.काॅ. बळी, कंपनीकडून वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तीन वेळा बैठक घेऊन मागील करार पेक्षा ५०% टक्के मोबदल्यात वाढ व शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे, पाईपलाईन, बोअरवेल, व मुरुमाचे झालेले नुकसान कंपनी भरून देईल या मुद्यावर यशस्वी तोडगा काढण्यात भूमिपुत्र ला यश आले. योग्य तोडगा निघावा म्हणून डॉ.जितेंद्र गवळी, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, जिल्हा प्रवक्ते देव इंगोले, तालुका अध्यक्ष संतोष सुर्वे, युवक जिल्हाध्यक्ष  सचिन काकडे, गजानन काकडे यांनी पुढाकार घेतला होता.

कंपनीला जमीन दिलेले शेतकरी दत्तराव शेळके, शाम कड, प्रल्हाद कड, विश्वास कड, विठ्ठल कड, गणेश कड, अभिषेक कड यांच्यासह  शेतकर्यांनी   भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे आभार मानले.






0 Response to "भूमिपुत्रच्या प्रयत्नाने सावरगांवच्या शेतकऱ्यांना मिळाला न्याय"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article