-->

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना कामगार कल्याण मंडळाचा दिलासा  मंडळाच्या सर्व योजनांचा तीन वर्षापर्यत लाभ

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना कामगार कल्याण मंडळाचा दिलासा मंडळाच्या सर्व योजनांचा तीन वर्षापर्यत लाभ

 


साप्ताहिक सागर आदित्य/

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना कामगार कल्याण मंडळाचा दिलासा

मंडळाच्या सर्व योजनांचा तीन वर्षापर्यत लाभ

वाशिम - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील ज्या नोंदीत कामगारांचा कोव्हिड 19 मुळे मृत्यू झालेला आहे अशा सर्व कामगारांच्या कुटुंबियांना मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ पुढील तीन वर्षे देण्यात येणार असल्याची माहिती कामगार कल्याण केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.            

           कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्या निर्देशानुसार सदर लाभ देण्यात येणार आहेत. त्यानुसार कामगार पाल्यांनी मंडळाच्या योजनांसाठी संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे. मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणार्‍या नोंदीत आस्थापनांतील कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मंडळातर्फे विविध आर्थिक लाभाच्या योजनांसह कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने इयत्ता दहावी व त्यापुढील शिक्षण घेणार्‍या कामगार पाल्यांसाठी 2 ते 5 हजार रूपये शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी 50 हजार रूपये शिष्यवृत्ती, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणार्‍या कामगार व कामगार पाल्यांना 2 ते 15 हजार रूपये शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक खरेदी किंमतीच्या 50 टक्के रक्कम अर्थसहाय्य, एमएससीआयटी अभ्यासक्रम शुल्काच्या 50 टक्के रक्कम अर्थसहाय्य, गंभीर आजार उपचारासाठी 5 ते 25 हजार रूपये अर्थसहाय्य, कामगार लेखकांना स्वलिखीत पुस्तक प्रकाशनासाठी 10 हजार अर्थसहाय्य, शिवणमशीन खरेदीसाठी 90 टक्के अर्थसहाय्य, 10 वी 12 वी परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्‍या गुणवंत कामगार पाल्यांचा गौरव आदी योजनांचा समावेश आहे. तसेच कामगार कुटुंबियांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंडळातर्फे युनिसेफच्या सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत. कामगाराचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास पुढील 3 वर्षे त्यांच्या कुटुंबियांना मंडळाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. त्यानुसार कोविड आजारामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना देखील मंडळाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती वाशिम येथील कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात आली असून अधिक माहितीसाठी मंडळाच्या नजीकच्या केंद्रास किंवा पब्लीक डॉट एमएलडब्ल्युबी डॉट ईन (public.mlwb.in) या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








_____________________________________________________________












 




0 Response to "कोरोनामुळे मृत्यु झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना कामगार कल्याण मंडळाचा दिलासा मंडळाच्या सर्व योजनांचा तीन वर्षापर्यत लाभ"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article