-->

समाजकार्य महाविद्यालच्या विद्यार्थ्यांमार्फत बेटी बचाव-बेटी पढाव चा गजर!

समाजकार्य महाविद्यालच्या विद्यार्थ्यांमार्फत बेटी बचाव-बेटी पढाव चा गजर!


साप्ताहिक सागर आदित्य /

समाजकार्य महाविद्यालच्या विद्यार्थ्यांमार्फत बेटी बचाव-बेटी पढाव चा गजर!

गावात जाऊन करताहेत जनजागृती!
महिला व बालविकास अधिकारी प्रियंका गवळींनी केले उद्घाटन
वाशिम दि. 14
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रशिणार्थी विद्यार्थ्यांच्या वतीने बेटी बचाव-बेटी पढाव या शासनाच्या उपक्रमाबाबत लोकांमध्ये जनजागृतीसाठी करण्यात येत आहे. दि.१३ ते १७ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ  एकात्मिक महिला व बाल विकास अधिकारी (ग्रामिण) प्रियंका गवळी यांच्या हस्ते दि.१३ रोजी ग्रा.पं. सोनखास येथे करण्यात आला. गवळी यांनी सामाजिक-राजकीय तसेच अन्य क्षेत्रात महिलांच्या योगदानाची माहिती दिली. स्री- पुरुष समानतेचे तत्व व्यवहारात आणल्यास स्रीभ्रुण हत्येला आळा बसेल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे  गवळी म्हणाल्या.  यावेळी अॅड. राधा नरवलिया, सरपंच देमाजी बांगरे, उपसरपंच डाॅ. श्यामसुंदर गोरे, मुख्याध्यापक जगन्नाथ आरु, शिक्षक बबन काकडे यांनी मार्गदर्शन केले. श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. आर एस मडावी यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन एम.एस.डब्ल्यु. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनी दिपाली सांबर यांनी केले. आभार प्रदर्शन शुभम जवंजाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी रंजना बुंदे, अश्विनी तायडे, सचिन आसोले, पुष्पा लवटे यांनी परिश्रम घेतले.












____________________________________________________________________
_________________________










0 Response to "समाजकार्य महाविद्यालच्या विद्यार्थ्यांमार्फत बेटी बचाव-बेटी पढाव चा गजर!"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article