-->

मुख्याधिकार्‍यावर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी

मुख्याधिकार्‍यावर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी

 


साप्ताहिक सागर आदित्य/

मुख्याधिकार्‍याच्या चुकीच्या आदेशाने उत्तम स्थितीतील तीन मजली इमारत जमीनदोस्त

रामकिशोर राठी यांची पोलीस स्टेशनला फिर्याद

मुख्याधिकार्‍यावर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी

वाशिम - एकत्रित कुटुंबाच्या मालमत्तेत हिस्सेदारम्हणून हक्क व अधिकार असतांना विश्वासात घेतले नाही तसेच मुख्याधिकार्‍यांनी कोणतीही पडताळणी न करता सिट नं. ६१, सिट सर्वे नं. ३४८ मधील १५२२ चौ. मिटर जागेवरील तीन मजली चांगल्या स्थितीतील इमारत पाडण्याचे आदेश दिले. त्यामुळे सदर इमारत पाडण्यात आली. या प्रकरणात मालमत्तेत गैरअर्जदार सत्यनारायण राठी व मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी अर्जदाराची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी रामकिशोर सेवाराम राठी यांनी १३ डिसेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीव्दारे केली आहे.

    फिर्यादीत नमूद केले आहे की, स्थानिक पाटणी चौक येथे सिट नं. ६१ मध्ये १५२२ चौ.मी. जागेवर किशोर हार्डवेअरची तीन मजली बिल्डींग होती. ही जागा एकत्रित कुटुंबाची मालमत्ता म्हणून रामकिशोर राठी, सत्यनारायण राठी यांच्यासह आई व बहीणीच्या नावावर असून त्यांचा मालकी अधिकार आहे. मात्र गैरअर्जदार सत्यनारायण राठी यांनी योगेश सावळकर यांच्याकडून खोटे कागदपत्रे तयार करुन व खोटा अहवाल तयार करुन सदर इमारत पाडण्याकरीता नगर परिषदेत अर्ज सादर केला. मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी याप्रकरणी स्थळ निरिक्षण व मालमत्तेचे अवलोकन केले नाही. तसेच सदर मालमत्तेच्या इतर मालकांची शहानिशा केली नाही. केवळ कागदपत्रांच्या आधारे गैरअर्जदारासोबत संगनमत करुन उत्तम स्थितीतीत इमारत पाडण्याचे आदेश दिले. शहरात अनेक वर्षे जुनी व जिर्ण अवस्थेत असलेल्या इतर इमारती आहेत. परंतु त्याकडे मुख्याधिकारी लक्ष देत नाहीत. उत्तम स्थितीतील असलेली माझ्या मालकीची इमारत पाडण्याचे चुकीचे आदेश पारित करुन मुख्याधिकार्‍यांनी माझे खुप मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे गैरअर्जदार सत्यनारायण राठी व मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अर्जदार रामकिशोर राठी यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीव्दारे केली आहे.








_________________________________________________________________














0 Response to "मुख्याधिकार्‍यावर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article