स्त्री हा घराचा कणा असते
साप्ताहिक सागर आदित्य
एक तरी मुलगी असावी कळी उमलतांना पाहता यावी, तिने मनातील गुपित हळूच आपल्या कानात सांगावे, खरच घरात एक तरी मुलगी असावी मुलगी जन्माला येणे म्हणजे खरच भाग्याची गोष्ट आहे, निसर्गाने स्त्रीला प्रज्वलन शक्ती दिली आहे. कारण स्त्री ही घराचा कणा असते एक स्त्री घर आणि समाज अशा दोन्ही जबाबदार्या उत्तमरित्या सांभाळू शकते यासाठी घर आणि समाजात स्त्रीला सन्मानाची आणि आदराची वागणूक मिळणे गरजेचे आहे. परंतू समाजात असं चित्र दिसत नाही आणि यासाठी कारण आयुष्यात लेकीचं असणं खूप भाग्याची गोष्ट मानली जाते. आणि याची जाणीव लोकांना तिरस्कार व्हावे म्हणून हा साजरा करावा लागतो. ज्या प्रमाणे आई आणि लेकीचं नात असत त्याचप्रमाणे बाप व मुलगी हे जगातलं सगळ्यात सुंदर आणि गोड नात मानलं जात वडीलांचं त्यांच्या लेकीवर सर्वात जास्त प्रेम असत, लेकीला बाबांच्या कुशीत खुप सुरक्षित तिच्या नाना तर्हेच्या मागण्या हट्ट पुरवताना बाबांना चांगलीच तारांबळ उडते. इवल्याश्या पावलांना पूर्ण घर आनंदीत होऊन जात. आजवर रिकाम असलेलं घर तिच्या येण्यानं गोकुळ होऊन जात. तिचे हात नंतर आई- वडीलांचा सादर होतात तिचे ईवले ईवलेशे डोळे नंतर आई वडीलांसाठी जीवन होऊन जाते तिचे नाजूक कोमल ओठ नंतर बडबड करणारी अखंड कविता होऊन जाते जी बडबड कधी संपूच नये असं प्रत्येक आई-वडीलांना वाटतं. अशा या लाडक्या लेकीला खुप शुभेच्छा!
0 Response to " स्त्री हा घराचा कणा असते"
Post a Comment