-->

माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन!

माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन!



 साप्ताहिक सागर आदित्य 

📢 माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन!

📍 सवड, ता. रिसोड | सेवा संकल्प अभियान


सेवा संकल्प अभियानांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, सवड येथे २८ सप्टेंबर २०२६ रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ॲड. गजानन गवळी यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार अधिनियम, २००५ चे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.


⚖️ माहिती अधिकार कायद्याच्या विविध पैलूंची माहिती देताना त्यांनी नागरिकांसाठी या कायद्याचे महत्त्व विशद केले. अध्यक्षस्थानी एस. बी. डोंगरे होते. त्यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली.


🙌 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहातील विद्यार्थी आशिष मनमोटे यांनी केले, तर चारोळे सर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला वसतिगृहातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


#सेवासंकल्पअभियान #माहितीअधिकारदिन #माहितीअधिकारअधिनियम #कायदेविषयकजनजागृती #विद्यार्थी #शासकीयवसतिगृह #रिसोड #वाशिम

0 Response to "माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन!"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article