भारत प्राथमिक मराठी शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक मराठी शाळेत ‘वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा
रिसोड : येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन ’ विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे होत्या. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका ज्योती दुबे आणि कैलास खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रकट वाचन, पुस्तक वाचन, गोष्टींचे वाचन आणि पुस्तकांतील प्रेरणादायी विचारांचे कथन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा परिचय करून देत विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावून घेण्याचे आवाहन केले. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि भाषिक कौशल्यांचा विकास होतो. तसेच नियमित वाचनामुळे विचारांना नवी दिशा मिळून आत्मविश्वास वाढतो, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजून घेण्याची आणि ज्ञानवृद्धीची प्रेरणा मिळाली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका मोनिका भांदुर्गे, लक्ष्मी जुमडे आणि गजानन डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Response to "भारत प्राथमिक मराठी शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन "
Post a Comment