ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावेत! सहाय्यक आयुक्त पीयूष चव्हाण
साप्ताहिक सागर आदित्य
👵👴 ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावेत!
सहाय्यक आयुक्त पीयूष चव्हाण
सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी, रक्तदान व जनजागृती कार्यक्रम
वाशिम, दि. १ ऑक्टोबर : ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना असून, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ नव्या पिढीने घ्यावा, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम पीयूष चव्हाण यांनी केले.
🩺 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी
सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
🩸 आठ रक्तदात्यांचे रक्तदान
यानंतर झालेल्या रक्तदान शिबिरात दिपक गायकवाड, आश्विन खंडारे, भाग्यवान गजानन तिडके, महादेव उगले, संतोष चव्हाण, प्रमोद गायकवाड, अजय अशोक फाळे आणि रविंद्र मुरलीधर कांबळे या आठ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
🏛️ मुख्य कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा उद्घाटक म्हणून सहाय्यक आयुक्त पीयूष चव्हाण होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रकाश गवळीकर, वनमालाताई पेंढारकर, अरुणा बबनराव ताजणे, प्रज्ञानंद भगत, शिवमंगल अप्पा राऊत, रामबकस डेंढुळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त चंद्रभान पौळकर, माऊली वृद्धाश्रम, मालेगावच्या अध्यक्षा प्रांजली पाध्ये तसेच विशेष अधिकारी राहुल चोंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात वरिष्ठ लिपीक हरीष वानखेडे यांनी दिनाचे महत्त्व व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या निराकरणाच्या उपाययोजनांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सामाजिक सुरक्षा, वृद्धाश्रम आणि शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.
🎤 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपीक सारंग गावंडे यांनी केले, तर आभार वरिष्ठ लिपीक हरीष वानखेडे यांनी मानले.
🌿 ज्येष्ठांचे अनुभव, नव्या पिढीला दिशा देणारे!
#सेवा_संकल्प_अभियान #सेवा_संकल्प_अभियान२०२६ #जागतिक_ज्येष्ठ_नागरिक_दिन #ज्येष्ठ_नागरिक #ज्येष्ठांचे_अनुभव #आरोग्य_तपासणी #रक्तदान #जनजागृती #समाजकल्याण #वाशिम
0 Response to "ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावेत! सहाय्यक आयुक्त पीयूष चव्हाण"
Post a Comment