गोभणी येथील ग्राम संघर्ष समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
साप्ताहिक सागर आदित्य
गोभणी येथील ग्राम संघर्ष समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
ग्राम गोभणी येथील गट नंबर 521 मध्ये साधारणतः 200 घरे मागील 30 ते 40 वर्षापासून निवासी अतिक्रमणे करून राहत आहेत. व ते ग्रामपंचायतीचा भोगवटदार म्हणून घर टॅक्स भरत आहे, शासनाने काढलेल्या सन 2011 च्या अगोदरचे निवासी अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठीचे पात्र लाभार्थी आहेत.व त्या संबंधित पुरावे म्हणून पूर्वीचे विजेचं बिल,घर टॅक्स पावत्या ,जागेचा 8अ, रेशन कार्ड ,दारिद्र्य रेषेचे कार्ड इत्यादी पुराव्यानिशी ग्रामपंचायत अंतर्गत पंचायत समिती रिसोड येथे बऱ्याच दिवसापासून सादर केले आहे.परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसुन 31डिसेबंर शेवटची तारीख आहे. त्या अनुषंगाने ते पूर्ण करून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात फाइल्स पाठविण्यात यावे. त्याचप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांचे घरांचे काम पूर्ण झाले असून त्यांना उर्वरित हप्ते मिळावे.अशी विनंती ग्राम संघर्ष समितीने केली आहे.व तसें आश्वासन गटविकास अधिकारी यांनीही दिलं आहे. यावेळी शिल्पकार विजय नारायण राऊत, शेख सादिक शेख वहाब, शेख रसूल शेख जानी, शेख नय्युम शेख शब्बीर, अशोक इंगळे इत्यादी ग्राम संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.
0 Response to "गोभणी येथील ग्राम संघर्ष समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन"
Post a Comment