-->

दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी, चारा व रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या

दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी, चारा व रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या

 


 साप्ताहिक सागर आदित्य 

दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी, चारा व रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या


जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


📌 दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक


वाशिम, : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता, रोजगार हमीची कामे तसेच उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन याला प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाहा, रोहयो उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.


🌧️ अपेक्षित पर्जन्यमानाच्या ६१.७ टक्के पाऊस


दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्ह्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या ६१.७ टक्के पाऊस झाला असून, खरीप हंगामात ९८.४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.


💧 आजरोजी जिल्ह्यातील २ मध्यम व ७५ लघु प्रकल्पांमध्ये एकूण १२१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, त्याची टक्केवारी ४०.९६ आहे. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले.


🐄 ३१७ दिवसांचा चारा उपलब्ध राहण्याचे नियोजन


पशुधनासाठी जिल्ह्यात १३ लक्ष २९ हजार १३८ मेट्रिक टन चारासाठा उपलब्ध असून, या साठ्याच्या आधारे ३१७ दिवसांचा चारा उपलब्ध राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


रब्बी हंगामासाठी वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी १०० लक्ष रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पातून २० लक्ष रुपयांच्या वैरण बियाणे वाटपाचे प्रस्तावित नियोजन आहे.


ई-क्लास जागेवर विकसित भारत ग्रामीण योजनेअंतर्गत वैरण उत्पादन, वनक्षेत्रातील चारा उपलब्ध करून घेणे तसेच ज्वारी, बाजरीसारख्या कमी पर्जन्यात व जलद वाढणाऱ्या चारा पिकांच्या वाणांची पेरणी करण्याचे नियोजन करावे, असे संबंधित यंत्रणेला निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.


👷 रोजगार हमीच्या कामांना गती


रोजगार हमीच्या वार्षिक कृती आराखडा २०२६-२७ मध्ये ग्रामपंचायत स्तरावर ५६ हजार १२२, तर यंत्रणा स्तरावर १ लक्ष ३६ हजार २४९, अशी एकूण १ लक्ष ९२ हजार ३७१ कामे प्रस्तावित आहेत.


दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी युक्तधारा प्रणालीमध्ये जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींनी नियोजन सुरू केले असून, एकूण २७ हजार ३३७ कामांचा समावेश करण्यात आला आहे.


रोजगार हमीची कामे गरजेनुसार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी नियोजनाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले.


🌱 पाणी, चारा आणि रोजगाराच्या उपाययोजनांना प्राधान्य देत दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज !


#दुष्काळसदृश_परिस्थिती #दुष्काळ_देखरेख_समिती #वाशिम #जिल्हा_प्रशासन #पाणी_नियोजन #चारा_नियोजन #रोजगार_हमी #मनरेगा #खरीप_हंगाम #रब्बी_हंगाम #जलसंधारण #पशुधन #सेवा_संकल्प_अभियान

0 Response to "दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी, चारा व रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article