-->

आजी-आजोबांचा सन्मान करत विद्यार्थ्यांनी घेतली आदराची शपथ!  📍 सवड, ता. रिसोड |

आजी-आजोबांचा सन्मान करत विद्यार्थ्यांनी घेतली आदराची शपथ! 📍 सवड, ता. रिसोड |

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सेवासंकल्पअभियानांतर्गत  

आजी-आजोबांचा सन्मान करत विद्यार्थ्यांनी घेतली आदराची शपथ!

📍 सवड, ता. रिसोड |

 सेवा संकल्प अभियान


ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव, कृतज्ञता आणि संस्कारांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, सवड येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी *ज्येष्ठ नागरिक दिन* साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘आजी-आजोबा-शिक्षक-मुले’ बैठकीचे आयोजन करण्यात आले.


💐 कार्यक्रमात उपस्थित आजी-आजोबांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आजी-आजोबांशी आदराने आणि सन्मानपूर्वक वागण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.


👨‍👩‍👧‍👦 सहाय्यक शिक्षिका श्रीमती इंगोले यांनी आजी-आजोबांचे कुटुंबातील महत्त्व, त्यांचा आधार आणि मुलांच्या जडणघडणीतील संस्कारांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. भगत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


#सेवासंकल्पअभियान #ज्येष्ठनागरिकदिन #आजीआजोबा #संस्कार #विद्यार्थी #शासकीयनिवासीशाळा #सवड #रिसोड #वाशिम #जनजागृती

0 Response to "आजी-आजोबांचा सन्मान करत विद्यार्थ्यांनी घेतली आदराची शपथ! 📍 सवड, ता. रिसोड |"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article