-->

पंचायत समिती वाशिम येथे स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नियमांबाबत आशा व अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण

पंचायत समिती वाशिम येथे स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नियमांबाबत आशा व अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सेवा संकल्प अभियानातून आशा व अंगणवाडी सेविकांना स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नियमांचे प्रशिक्षण! 


वाशिम,  : सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती वाशिम येथे स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नियमांबाबत आशा व अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे आणि स्वच्छ भारत मिशनचे प्रकल्प संचालक गजानन खुळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण घेण्यात आले.


घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे याबाबत प्रशिक्षणातून माहिती देण्यात आली. गावपातळीवर स्वच्छतेचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.


सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी लोकसहभाग वाढविणे आणि ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.


#सेवा_संकल्प_अभियान #स्वच्छता_ही_सेवा #घनकचरा_व्यवस्थापन #स्वच्छ_भारत_मिशन #वाशिम

0 Response to "पंचायत समिती वाशिम येथे स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नियमांबाबत आशा व अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article