-->

स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती दैनंदिन जीवनातील संस्कार बनावी.”

स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती दैनंदिन जीवनातील संस्कार बनावी.”



साप्ताहिक सागर आदित्य 

 🧹 ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून विकसित भारत घडवण्यासाठी हातभार लावूया! 🇮🇳🧹


“स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती दैनंदिन जीवनातील संस्कार बनावी.”


— जिल्हा युवा अधिकारी कु. आरुषी


सेवा पंधरवाड्यानिमित्त ५०० हून अधिक युवक-विद्यार्थ्यांचा श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग!


वाशिम, दि. २ ऑक्टोबर : युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या मेरा युवा भारत केंद्र, वाशिम यांच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा पंधरवाडा’ आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ उपक्रम राबविण्यात आला.


या उपक्रमाच्या अनुषंगाने वाशिम बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सामूहिक सहभागातून बसस्थानक, मोक्षधाम, तलाव व स्मशानभूमी परिसराची स्वच्छता तसेच जलस्वच्छता करण्यात आली. त्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.


या स्वच्छता मोहिमेत मेरा युवा भारत स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच विविध युवा मंडळांचे स्वयंसेवक सहभागी झाले. ५०० हून अधिक युवक-विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.


🌱 या अभियानात सहभागी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग


▪️ नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ, केकतउमरा

▪️ श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय

▪️ श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय

▪️ गोटे महाविद्यालय

▪️ राजस्थान महाविद्यालय


या महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.


यावेळी श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल राऊत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. उद्धव बनकर, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. अश्विन काकडे, डॉ. देवानंद अंभोरे, डॉ. विजय गावंडे, प्रा. डी. एस. गोरे, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पंढरी गोरे, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ, केकतउमरा येथील कोषाध्यक्ष दीपक पट्टेबहादूर आणि लोकशाहीर मधुकर गायकवाड यांची उपस्थिती होती.


🎭 कलेतून स्वच्छतेचा संदेश!


राजा प्रसेनजीत संस्थेच्या सांस्कृतिक संचाच्या वतीने पथनाट्य, लोकगीते व सांस्कृतिक सादरीकरणातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.


या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक प्रदीप पट्टेबहादूर आणि निलेश खोरणे यांनी पुढाकार घेतला.


#स्वच्छता_ही_सेवा

#सेवा_पंधरवाडा

#सेवा_संकल्प_अभियान

#मेरा_युवा_भारत

#विकसित_भारत

#स्वच्छ_भारत

#युवा_शक्ती

#श्रमदान

#वाशिम

0 Response to "स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती दैनंदिन जीवनातील संस्कार बनावी.”"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article