मालेगाव तालुक्यातील शिवारात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी
साप्ताहिक सागर आदित्य
🌾 मालेगाव तालुक्यातील शिवारात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी
📌 नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
वाशिम, : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी १३ सप्टेंबर रोजी मालेगाव व मौजे नांगरतास येथील शेतशिवारात सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची सद्यस्थिती तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.
🌧️ पावसामुळे पिकांवर झालेला परिणाम, नुकसानीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
👥 यावेळी तहसीलदार दीपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
#वाशिम #मालेगाव #पिकनुकसान #सोयाबीन #कापूस #शेतकरी #जिल्हाधिकारी #पिकांचीपाहणी #नांगरतास #जिल्हाप्रशासन
0 Response to "मालेगाव तालुक्यातील शिवारात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी"
Post a Comment