-->

गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींसाठी संपर्क व्यवस्था जाहीर

गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींसाठी संपर्क व्यवस्था जाहीर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींसाठी संपर्क व्यवस्था जाहीर


वाशिम जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध


वाशिम,:  श्री गणेशोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभाग आणि पोलीस ठाणेनिहाय नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण-उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ही विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष यंत्रणा तैनात


जनहित याचिका क्र. १७३/२०१० (महेश बेडेकर वि. महाराष्ट्र शासन व इतर) प्रकरणी  उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक सणापूर्वी ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकाऱ्यांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण खंडारे यांनी ही सूची जाहीर केली आहे.


 जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी सूची


१. उपविभाग वाशिम:

• उपविभाग वाशिम: रामकृष्ण पवार (उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम) – मो. ७०५७००७९८३ / ०७२५२-२३२५४५

• वाशिम शहर:  संजय चौधरी (पोलीस निरीक्षक, वाशीम शहर) – मो. ८८८८७६८२१८ / ०७२५२-२३२१००

• वाशिम ग्रामीण:  श्रीदेवी पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाशीम ग्रामीण) – मो. ९०११३८९९८३ / ०७२५२-२३४१००

• रिसोड:  रामेश्वर चव्हाण (पोलीस निरीक्षक, रिसोड) – मो. ९८२३०९५५२१ / ०७२५१-२२२३५६

• मालेगाव:  राजेश खेरडे (पोलीस निरीक्षक, मालेगाव) – मो. ७८८७४८९२०५ / ०७२५४-२७१२५३

• शिरपूर:  योगिता भारव्दाज (सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिरपूर) – मो. ८९७५४४४८०० / ०७२५४-२७४००३

२. उपविभाग मंगरुळपीर:

• उपविभाग मंगरुळपीर:  विशाल क्षीरसागर (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर) – मो. ८३०८०२८५९९ / ०७२५३-२६०६६२

• मंगरुळपीर: किशोर शेळके (पोलीस निरीक्षक, मंगरुळपीर) – मो. ९४२२९५८६१५ / ०७२५३-२६०३३३

• अनसिंग: . संतोष शेळके (पोलीस निरीक्षक, अनसिंग) – मो. ८१०८१२४२४४ / ०७२५२-२२६०३४

• आसेगाव: रामकृष्ण भाकडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, आसेगाव) – मो. ७३८५५४४८६६ / ०७२५३-२३५५५८

• जऊळका: श्री. हिवरकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, जऊळका) – मो. ७७७४०५४१३३ / ०७२५४-२७२०१६

३. उपविभाग कारंजा:

• उपविभाग कारंजा:  मनिष ठाकरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा) – मो. ९८५०१०६०५७ / ०७२५६-२२२००८

• कारंजा शहर:  अमर चौरे (पोलीस निरीक्षक, कारंजा) – मो. ९८२३३१०६७१ / ०७२५६-२२२१००

• कारंजा ग्रामीण:  प्रविण शिंदे (पोलीस निरीक्षक, कारंजा ग्रामीण) – मो. ९८२३२२००४६ / ०७२५६-२२२४००

• मानोरा:  नैना पोहेकर (पोलीस निरीक्षक, मानोरा) – मो. ९९२३०३२४४७ / ०७२५३-२३३२२९

• धनज:  जगदीश बांगर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, धनज) – मो. ९६५७६६२३३० / ०७२५६-२३२०३०


तक्रार नोंदवण्यासाठी थेट संपर्क माध्यमे

ध्वनी प्रदूषणाची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात:

• पोलीस नियंत्रण कक्ष (वाशिम): ११२

• एसएमएस (SMS): ८६०५८७८२५४

• ई-मेल (Email): sp.washim@mahapolice.gov.in


जिल्हास्तरीय ध्वनी प्रदूषण नियंत्रण समिती

तक्रारींचे निवारण व देखरेखीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे:

• अध्यक्ष:  लता फड (अपर पोलीस अधीक्षक, वाशिम) – मो. ९९२३७९८५७० | Email: readeraddspwashim@gmail.com, addlsp.wsm@mahapolice.gov.in

• सदस्य:  किरण दांडगे (पोलीस उपअधीक्षक - गृह, वाशिम) – मो. ७४०७१००१०० | Email: dysphome.wsm@mahapolice.gov.in

• सचिव: प्रादेशिक अधिकारी (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अमरावती) – दुर्ध्वनी: ०७२१-२५६३५९३ | Email: roamravati@mpcb.gov.in


नागरिकांनी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0 Response to "गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींसाठी संपर्क व्यवस्था जाहीर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article