स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून मानोरा पंचायत समिती परिसरात श्रमदान
साप्ताहिक सागर आदित्य
🧹 ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून मानोरा पंचायत समिती परिसरात श्रमदान
🌿 २ ऑक्टोबरच्या विशेष ग्रामसभेत जल समर्पण, योजना हस्तांतरण व स्वच्छता उपक्रमांचे नियोजन
📍 वाशिम
‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत पंचायत समिती मानोरा येथे गटविकास अधिकारी राजपुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कक्षाचे मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर तसेच ग्रापापू उपविभाग, मानोरा येथील अक्षय खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
🗓️ यावेळी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्तरावर स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन व जनसहभागाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
💧 २ ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून जल समर्पण, योजना हस्तांतरण तसेच विविध स्वच्छता उपक्रमांचे नियोजन करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्तरावर या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले.
🤝 कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर पंचायत समितीच्या संपूर्ण परिसरात श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली. अधिकारी, कर्मचारी व उपस्थितांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानात सहभागी होत स्वच्छतेचा संदेश दिला.
✨ स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही, तर जनसहभागातून साकार होणारी सामूहिक चळवळ आहे!
#सेवासंकल्पअभियान
#स्वच्छताहीसेवा #SwachhataHiSeva #स्वच्छता #श्रमदान #मानोरा #वाशिम #जनसहभाग #विशेषग्रामसभा
0 Response to "स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून मानोरा पंचायत समिती परिसरात श्रमदान"
Post a Comment