-->

गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी; नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती!

गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी; नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती!



 साप्ताहिक सागर आदित्य 

🏥 गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी; नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती!


‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत मोफत आरोग्य शिबिरे


‘लोकसंवाद-२०२६’मधून विविध शासकीय योजनांची जनजागृती


वाशिम,   : गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी नागरिकांसाठी सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.


🩺 तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी व औषधोपचार


सामुदायिक आरोग्य शिबिरांमध्ये शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, सामान्य रुग्णालय, धर्मादाय रुग्णालये तसेच सेवाभावी सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. शिबिरांमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांची आरोग्य तपासणी करतील. रक्तदाब, मधुमेह तसेच प्राथमिक व आवश्यक निदानात्मक तपासण्या मोफत करण्यात येतील. गरजेनुसार आवश्यक औषधांचेही मोफत वितरण करण्यात येत आहे.


तपासणीदरम्यान गंभीर आजाराचे निदान झाल्यास संबंधित रुग्णांना पुढील उपचारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध उपचार सुविधा तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध होणाऱ्या मदतीबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


📢 ‘लोकसंवाद-२०२६’मधून शासकीय योजनांची माहिती


गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सोनखास येथे २१ सप्टेंबर रोजी विविध योजनांचे स्वरूप, त्यासाठीची पात्रता, उपलब्ध लाभ तसेच लाभ मिळविण्याची प्रक्रिया याबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.


 नागरिकांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा!


जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या परिसरातील नोंदणीकृत गणेश मंडळांमध्ये आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेट देऊन मोफत आरोग्य तपासणी व उपलब्ध आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.


तसेच ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले.


👨‍⚕️ आरोग्य शिबिरातील सहभाग :

डॉ. प्रताप गोटे,डॉ. गणेश इढोळे

तेजस वानखेडे,विशाल पुरी (नर्सिंग)

अनिकेत दाहोरे,विनोद चौधरी (कॅम्प मॅनेजर, वाशिम क्रिटिकल केअर)


#लोकसंवाद२०२६

#गणेशोत्सव२०२६ #श्रीगणेशाआरोग्याचाअभियान२०२६ #आरोग्यशिबिर #आरोग्ययोजना #मोफतआरोग्यतपासणी #वाशिम #जिल्हामाहितीकार्यालयवाशिम

0 Response to "गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी; नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती!"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article