स्वच्छता ही सेवा आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात घनकचरा व्यवस्थापन
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छता ही सेवा आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात घनकचरा व्यवस्थापन
नियम 2026 बाबत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला गटविकास अधिकारी मितेश पाटील, सहागटविकास अधिकारी श्री रमेश कंकाळ, जिल्हा कक्षाचे प्रफुल्ल काळे आदींची उपस्थिती होती. सोबतच पंचायत समिती आवारात श्रमदान करुन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
तसेच ग्रामपंचायत जऊळका येथेही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी मितेश पाटील, सहायक गटविकास अधिकारी रमेश कंकाळ यांनाही य मोहिमेत सहभाग घेतला.
0 Response to "स्वच्छता ही सेवा आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात घनकचरा व्यवस्थापन"
Post a Comment