-->

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे शिक्षक दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न .....

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे शिक्षक दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न .....

 


साप्ताहिक सागर आदित्य 

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे शिक्षक दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न .....

                               रिसोड तालुक्यातील एकमेव मुलींची भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन व गुणवंताचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. "शिक्षक हाच खरा राष्ट्रनिर्माता" .


कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमुख ( अध्यक्षा भारत मराठी प्राथमिक शाळा रिसोड) या होत्या, तसेच प्रमुख उपस्थितीत 

प्रमुख पाहुण्या सौ. पल्लवी ताई लांडे मॅडम* (गटविकास अधिकारी, रिसोड),  बद्रीनाथ कोकाटे  गटशिक्षणाधिकारी रिसोड.,सौ.पूजा उदावंत मॅडम (जलसंपदा अधिकारी, हिंगोली), प्राचार्या सौ. मंजुषा सु. देशमुख मॅडम भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड,  प्राचार्य संजय भांडेकर सर (भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड)सौ. रोज मेरी जोस मॅडम (मुख्याध्यापिका, सनराईज इंग्लिश स्कूल, रिसोड), मुख्याध्यापिका किरण दुबे मॅडम ह्या उपस्थित होत्या.


प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.त्या नंतर कार्यकर्माचे  प्रास्ताविक  प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून वर्षभरामध्ये विद्यार्थिनींनी केलेल्या प्रगतीचा चढता आलेख सांगत गुणवंत विद्यार्थिनींच्या पाठीवर आजच्या दिवशी शाबासकीची थाप देत त्यांचा यथोचित मानसन्मान व्हावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दात्यानी ज्या कायम स्वरुपी ठेव म्हणून ठेवल्या त्या व्याजावर विद्यार्थिनींना बक्षीस म्हणून शिल्ड, प्रमाणपत्र, आणि बक्षीस दिले जाते. असे भावोदगार आपल्या प्रस्तावितेतून केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी  सुमधुर स्वागत गीतगाऊन पाहुण्यांचे  स्वागत केले.विद्यार्थिनींनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे, गीते आणि नृत्य सादर केले. त्यानंतर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान केला जातो त्यामध्ये प्रा. पांडुरंग मोरे सर,  आनंद झडपे सर , व दादा रवी भाऊ  कुतरमारे या  सत्कार बाई  हस्ते करण्यात आला. त्यानंतर मनोगतामध्ये सत्काराला उत्तर देताना प्रा. पी एच मोरे हा सन्मान माझा एकट्याचा नसून दी आर्य शिक्षण संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा आहे. सत्कारामुळे नक्कीच काम करण्याला बळ मिळते. आणि जबाबदारी वाढते . उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना" शिक्षक म्हणजे समाजाचा आरसा होय"असे उदगार  बद्रीनाथ कोकाटे  गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षका विषयी काढले. तसेच प्रमुख अतिथी  सौ.पल्लवीताई लांडे मॅडम गटविकास अधिकारी पंचायत समिती रिसोड यांनी शिक्षका विषयी मत व्यक्त करतांना शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार असतो असे मत  व्यक्त केले. त्यानंतर पुजा उदावंत मॅडम जलसंपदा अधिकारी हिंगोली 2014 -2015 ची भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज जे काही मी आहे .त्या माझ्या यशामध्ये या भारत कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा खारीचा आणि मोलाचा सिंहाचा वाटा आहे. सर्व शिक्षक आणि शिक्षिकेविषयी त्यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली . व विद्यार्थिनींना प्रयत्न, जिद्द, साहस ,चिकाटी, मेहनत, करा असे भावस्पर्शी उदगार आपल्या मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सौ.जयश्रीताई  देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रथमतः सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत शिक्षक हा भारताचे नागरिक घडवणारा राष्ट्र निर्माता महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तसेच शिक्षकांचे समाजातील स्थान व महत्त्व यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विजय हराळकर सर व व सहनिवेदिका प्रा.विजया कौटकर मॅडमआणि भाग्यश्री बेळकुंडे मॅडम यांनी केले .व आभार प्रदर्शन भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय सुनील डहाळके सर यांनी केले.


या कार्यक्रमास पालक, गुणवंत विद्यार्थीनी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सर्व पाहुण्यांना व गुणवंत विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन करण्यात आली.

0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे शिक्षक दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न ....."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article