-->

वाशिम जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी

वाशिम जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वाशिम जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी

वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे अनेक भागात पिकांना आवश्यक असलेला ओलावा मिळालेला नाही. सोयाबीनसह इतर पिके शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असताना पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीपासून आतापर्यंत बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत व मजुरीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत—

वाशिम जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे.

खरीप हंगामातील सोयाबीन व इतर पिकांचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी व विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळवून द्यावी.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीस स्थगिती देण्यात यावी.

वाशिम जिल्ह्यामध्ये नवीन स्मार्ट मीटर बसविणे बंद करावे. सक्तीने बसविल्यास वीज ग्राहकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांना वीज पुरवठा दिवसा करण्यात यावा, कारण रात्री जंगलात पाणी उपसण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राणी व इतर धोके निर्माण होऊ शकतात.

राज्यभर उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात.

सार्वजनिक जनगणनेमध्ये OBC चा स्वतंत्र उल्लेख करण्यात यावा.

शासनाने या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांसोबत तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे.

 हे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍडव्होकेट दिलीपराव सरनाईक, मधुकर जुमडे, किसनराव मस्के,दिलीप देशमुख, शेतकरी नेते गजानन आमदाबादकर,विजयराव देशमुख, रामनाथ राठोड,सय्यद आजम,संजय राव देशमुख, मनीष भालेराव, समाधान माने, उज्वल देशमुख,सागर गोरे, जय विजय चव्हाण, सुरेश रत्नपारखी, बाळासाहेब लेमले, अभिषेक घुगे, राजूभाऊ जानीवाले, दादाराव देशमुख, रामेश्वर देवकर, शेख नजीर,ऍडव्होकेट प्रल्हाद बाजड, आमिर खान पठाण, संदीप लहाने, भागवत कालापाड, निवासराव मुसळे, मीनाताई वाठोरे, सुजाता वाठोरे,  अनिल धुळे, दामू अण्णा काळे, बाळासाहेब रोकडे, सुनील मापारी, वसंतराव भगत, उदेभान लांडगे,मोहन तात्या चौधरी, सुदाम राठोड, सुरेश ठोंबे, नारायण कंकाळ, सोपान राजगुरू, संदीप धोटे, संतोष गावंडे, विजय ढोबळे, राजू पुन्नेवार, मदन वायले, अजय मोतीवार, अनिल लोणसुने, मनोज गोरे,सुरेश मोरे सर, प्रशांत मुळे, शिवा ठाकरे, गणेश गायकवाड, संतोष पाठे,चेतन दळवी, गणेश धोटे, मुकिंदा कांबळे, उमेश जाधव, रणजीत राठोड, बाबाराव राठोड, आनंद चव्हाण, ज्ञानेश्वर अखंड, वाय पी राठोड सर,मोहन ढोबळे, मनोहर भालेराव, अर्जुनराव उदगीरे, असलम खान, गौतम आढागळे, प्रतीक कांबळे, महेश दंडे, गणेश फलटणकर, विनायकराव भेंडेकर, परवेज माजिद मिर्झा, जावेद शेख, स्वप्निल वाघ, सय्यद याकूब, विलास उत्तम कांबळे, आकाश वानखेडे, महादेव वानखेडे, उत्तम कुटे, पंढरी जाधव, सय्यद सद्दाम, इनायत पठाण, इरफान पठाण, उत्तम जाधव, सुरेश चौधरी, विनोद पडघान, दिनेश चौधरी, विठ्ठल वानखेडे

0 Response to "वाशिम जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article