भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत 'अनंत पारितोषिक योजने'अंतर्गत गुणवंतांचा गुणगौरव
साप्ताहिक सागर आदित्य
भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत 'अनंत पारितोषिक योजने'अंतर्गत गुणवंतांचा गुणगौरव
रिसोड:येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ (वर्ग १०वी व १२वी) च्या परीक्षेत विविध विषयांमध्ये सर्वाधिक गुण घेणाऱ्या तसेच इतर शालेय परीक्षेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व गुणगौरव सोहळा दिनांक ०५ सप्टेंबर २०२६ शनिवारला 'शिक्षक दिनाच्या' दिवशी शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थान सौ अमृताताई देशमुख तर प्रमुख अतिथी चे स्थान रिसोड पं.स.गट शिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे यांनी भूषविले. तसेच संस्थेअंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्वश्री मधुकर शिंदे, विनोदराव देशमुख, सौ मंजुषा देशमुख, सौ किरण दुबे व रोझमेरी मॅडम व्यासपीठावर विराजमान होते.शाळेचे प्राचार्य संजय भांडेकर यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये संस्थाचालक,शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या समन्वयाने शाळेची सर्वांगीण शैक्षणिक प्रगती होत आहे असे मत व्यक्त केले. यानंतर व्यासपीठावर विराजमान मान्यवरांच्या हस्ते विविध परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मानचिन्ह, पुष्पगुच्छ,प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळेस बहुसंख्य पालक व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी हजर होते. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचीही यथोचित भाषणे झाली यामध्ये विद्यार्थ्यांना उद्देशून सर्व शालेय परीक्षा व स्पर्धा परीक्षा यामध्ये सहभाग घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भविष्यात यश संपादन करावे असे आवाहन सौ अमृताताई देशमुख यांनी केले. या भव्य दिव्य कार्यक्रमाला शाळेचे उपमुख्याध्यापक संजय शर्मा, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर थोरात तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पी.एन.देशमुख सर तर आभार प्रदर्शन देवीकांत देशमुख सर यांनी व्यक्त केले.
0 Response to "भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत 'अनंत पारितोषिक योजने'अंतर्गत गुणवंतांचा गुणगौरव"
Post a Comment